ETV Bharat / state

'लॉकडाऊन शिथिलतेसंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल' - मुंबई लॉकडाऊन

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्येही पूर्वतयारी म्हणून बालचिकित्सा गृह प्रत्येक कोविड सेंटरमध्ये आरक्षित करीत आहोत. तर ब्लॅक फंगस, येलो फंगस यासंदर्भात आम्ही दक्षता घेऊन उपचार सुरू केलेले आहेत.

अस्लम शेख
अस्लम शेख
author img

By

Published : May 25, 2021, 8:50 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग विविध जिल्ह्यांमध्ये कमी होतांना दिसून य़ेत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमधील रुग्णसंख्याही कमी होत असल्यामुळे लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल. शिवाय ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊन उठू शकतो. परंतू सध्याच्या येणाऱ्या नवीन एसओपीप्रमाणे हॉटेल्स, इंडस्ट्री, सलून, व्यावसायिकांना दिलासा देण्यासंदर्भात टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

'या' बाबींवर कॅबिनेटमध्ये होईल निर्णय

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्येही पूर्वतयारी म्हणून बालचिकित्सा गृह प्रत्येक कोविड सेंटरमध्ये आरक्षित करीत आहोत. तर ब्लॅक फंगस, येलो फंगस यासंदर्भात आम्ही दक्षता घेऊन उपचार सुरू केलेले आहेत.तर दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत नुकसानभरपाई देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल, अशी प्रतिक्रियाही यावेळी अस्लम शेख यांनी दिली आहे.

हेही वाचा-उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्तभेट; निलेश राणेंचा गौप्यस्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.