ETV Bharat / state

Anganwadi Organization : सरकारने बळकटीकरणासाठी 50 अंगणवाड्या दिल्या; 10 वर्षांसाठी दत्तक

राज्यातील माता आणि बालकांना सदृढ करण्यासाठी अंगणवाड्या चांगल्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी सरकारने 50 अंगणवाड्या दहा वर्षासाठी दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत खासगी संस्थांसोबत आज सामंजस्य करार केला आहे.

Minister Mangal prabhat Lodha
सामंजस्य करार करताना मंत्री मंगलप्रभात लोढा
author img

By

Published : Jan 11, 2023, 7:50 PM IST

मुंबई - अंगणवाड्यांना गुटगुटीत करण्यासाठी सरकार 50 अंगणवाड्यांना 10 वर्षासाठी दत्तक देणार आहे. सरकारने खासगी संस्थांसोबत याबाबत सामंजस्य करार केला आहे. मुंबईसह कर्जतच्या अंगणवाड्यांचा या करारात समावेश आहे. महिला व बालकल्याण विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या सामंजस्य करारावर आज सही केली. त्यामुळे अंगणवाड्या किती प्रमाणात बळकट होणार हे येणारा काळच सांगणार असल्याची चर्चा करण्यात येत आहे.

Minister Mangal prabhat Lodha
सामंजस्य करार करताना मंत्री मंगलप्रभात लोढा

यांची होती उपस्थिती महिला व बालकल्याण विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि जनकल्याण समिती, युनायटेड वे मुंबई, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट, भव्यता फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ जुहू यांच्याशी हा सामंजस्य करार करण्यात आला. एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल, महिला व बालविकास विभागाचे उपसचिव वि. रा. ठाकूर, अवर सचिव खान, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर, जनकल्याण समितीचे अजित मराठे, युनायटेड वे मुंबईचे अनिल परमार, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे जय कुमार जैन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्टचे जयराम शेट्टी, भव्यता फाऊंडेशनचे कुनिक मणियार, लायन्स क्लब ऑफ जुहूचे अंकित अजमेरा यांची यावेळी उपस्थिती होती.

केलेल्या करारानुसार अंगणवाडी घेणार दत्तक राज्य सरकारने केलेल्या करारानुसार अंगणवाडी दत्तक घेतल्या जात आहेत. जनकल्याण समिती मुंबईतील १२ अंगणवाड्या दत्तक घेणार आहे. युनायटेड वे मुंबई आणि कर्जतमधील वीस अंगणवाड्या दत्तक घेणार आहे. सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी वडाळ्यामधील तीन अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट यांनी पश्चिम उपनगर येथील पाच, भव्यता फाउंडेशन यांनी मुंबई उपनगर घाटकोपर येथील पाच अंगणवाड्या, लायन्स क्लब ऑफ जुहू यांनी मुंबई उपनगरातील पाच अशा ग्रामीण व शहरी मिळून ५० अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. दत्तक घेतलेल्या कालावधीत या अंगणवाड्यांचे नूतनीकरण, रंगकाम, फर्निचर, क्षमता वाढ, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांची जबाबदारी देखील जनकल्याण समितीद्वारे घेण्यात येईल. अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी 9082269044 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

प्रत्येक माता, बालक सुदृढ ठेवण्यासाठी उपक्रम राज्यातील प्रत्येक माता निरोगी राहून, लहान बालक सुदृढ ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. सक्षम राज्य निर्मिती होण्यासाठी अंगणवाडी केंद्र दत्तक घेणे ही शासनाची नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. या संकल्पनेला सर्वांनी पुढे नेण्यासाठी ‘चला अंगणवाडी दत्तक धोरणाला हातभार लावू या व महाराष्ट्र राज्याला एक सक्षम व सुदृढ पिढी देवूया, असेही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. तर राज्यात एक लाख दहा हजार अंगणवाडी असून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्यांना स्मार्ट सुविधा देण्यात येतात. याव्यतिरिक्त उर्वरित अंगणवाड्यांना अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत विकास करण्यासाठी हे धोरण राबवण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

हे ही वाचा Child Adoption Easy : मूल दत्तक घेणे झाले सोपे, नियमात केला बदल; वाचा संपूर्ण नियमावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.