मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापले असताना भाजपचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अरेरावीची भाषा ( Gopichand Padalkar Rude language ) वापरली. सभागृहात त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूने हमरीतुमरी झाल्याने सभागृह पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
ये तू खाली बस : हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी सरकार विरोधात आक्रमक घोषणाबाजी करत विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला. तणावपूर्ण वातावरणात विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले. लक्षवेधीच्या तासाला, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी चर्चा करण्यासाठी तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्याकडे वेळ मागत असताना भाजपचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी विरोधी पक्षने नेत्यांना 'ये खाली बस', अशी अरेरावीची भाषा ( Gopichand Padalkar Rude Language To Ambadas Danve ) वापरली. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पडळकर यांना संबंधित वक्तव्याबाबत जाब विचारला. सभागृहात त्यामुळे एकच गदारोळ केला. दोन्ही बाजूचे सदस्य उठून उभे राहिल्याने हमरीतुमरी पर्यंत प्रकरण गेले. तालिका अध्यक्ष डावखरे यांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतरही गोंधळ वाढल्याने पंधरा मिनिटांसाठी सहभागृह तहकूब करण्यात आले.
पडळकर यांना समज देणार : सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या सदस्या मनीषा कायदे यांनी पडळकर यांच्या अवार्च्य भाषेबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार ( Manisha Kayande Complaint Neelam Gorhan ) केली. तसेच सतत अर्वाच्य विधान करणाऱ्या पडळकरना समज देण्याची मागणी केली. उपसभापतींनी या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्यास सांगितले. दरम्यान, सभागृहात शांतता पाळली जावी, दोन्ही बाजूने संयम राखावे. तसेच पडळकर यांच्या सहित भाजप सदस्यांना समज दिली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिल्याने वादावर पडदा पडला.