मुंबई Ganesh Festival 2023 : मुंबई महापालिकेकडून समुद्र किनारे आणि तलाव ठिकाणी विसर्जनाकरिता जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईमधील चौपाटी जसे गिरगाव, दादर, माहीम, जुहू समुद्र किनारे आणि काही ठिकाणी तलावावर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
194 कृत्रिम तलावात विसर्जन : मुंबईकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व अत्याधुनिक, दर्जेदार सेवा-सुविधांनी पूर्ण असावा, यासाठी प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाकरता मुंबईकरांनी पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन तलावांना पसंती दिली आहे. श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईत 73 नैसर्गिक ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहेत. तर 194 कृत्रिम तलाव विसर्जन स्थळ बनविली आहेत. आरोग्य विभाग देखील सज्ज झालं असल्याची माहिती डॉ. अल्फीया रिझबी यांनी दिली आहे.
एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला : पाच दिवसाच्या बाप्पांच्या विसर्जनला दुपार नंतर सुरुवात झाली. घरगुती गणपती आणि गौरी गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात आज मुंबईत झालं. गणपती बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर अशा प्रकारच्या घोषणा देत गणेश भक्तांनी आज बाप्पाला निरोप दिला.
शांततेत गणेश विसर्जन : महापालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारी नुसार संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास नैसर्गिक स्थळावर 7398 घरगुती गणपती, 61 सार्वजनिक गणपती, 739 गौरी विसर्जन करण्यात आलं तर कृत्रिम तलावात 3119 घरगुती गणपती, 29 सार्वजनिक गणपती, 300 गौरी विसर्जन करण्यात आले. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसल्यास माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. गणेश विसर्जना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वोपरीने तयारी करण्यात आले. ठिकठिकाणी पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज सायंकाळ पर्यंत 11646 घरगुती, सार्वजनिक गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती आहे.
जड अंतकरणाने निरोप : गणेश विसर्जनादरम्यान भाविकांनी ठिकठिकाणी गुलालासह फुलांची उधळण करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विसर्जनासाठी जात असताना गणरायांवर ठिकठिकाणी गुलालासह फुलांची उधळण करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष यावेळी सुरू होता. पाच दिवस बाप्पांची सेवा केल्यानंतर त्यांना निरोप देताना बालकांचे डोळे पाणावले होते. अखेर अनेक भाविकांनी गणरायांना जड अंतकरणाने निरोप दिला.
हेही वाचा: