ETV Bharat / state

मूर्तीकार खातूंच्या गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखान्याला लागलेली आग.. - fire news

मुंबईतले सुप्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कारखान्याला शनिवारी संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास भीषण आग लागली. चिंचपोकळी येथील अनंत मालवणकर मार्गावरील बावला कंपाऊंड येथे हा कारखाना आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

fire broken out in ganesh Idol factory chinchpokali
मूर्तीकार खातूंच्या गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखान्याला लागलेली आग..
author img

By

Published : May 3, 2020, 8:31 PM IST

Updated : May 3, 2020, 9:11 PM IST

मुंबई - मुंबईतले सुप्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कारखान्याला शनिवारी संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास भीषण आग लागली. चिंचपोकळी येथील अनंत मालवणकर मार्गावरील बावला कंपाऊंड येथे हा कारखाना आहे. प्रथम एका झाडाजवळ आग लागली. त्यानंतर ती विजय खातू यांच्या कारखाना परिसरात पसरली. यावेळी प्रसंगावधान दाखवत जे लोक होते त्यांनी बाहेर धाव घेतली.

मूर्तीकार खातूंच्या गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखान्याला लागलेली आग..

आगीत विजय खातू यांच्या कारखान्याचे नुकसान झाले आहे. तसंच रेश्मा खातू यांच्या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे. अनंत निवास या इमारतीच्या रहिवाशांना प्रचंड धुराचाही सामना करावा लागला. अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेतली आणि ही आग नियंत्रणात आणली. कुलिंग प्रक्रियाही तातडीने सुरू करण्यात आल्याने आग आटोक्यात आली. लॉकडाऊन असल्याने गणेश मूर्ती कार्यशाळेत कुणीही नव्हते त्यामुळे जिवितहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Last Updated : May 3, 2020, 9:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.