ETV Bharat / state

Mumbai Fire : मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील 'गॅलेक्सी हॉटेल'ला आग; 3 ठार तर 5 जखमी - Mumbai Fire Fire breaks out

मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील 'गॅलेक्सी हॉटेल'ला आग लागल्याची घटना घडलीये. या घटनेत तीन जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची माहिती 'बीएमसी'कडून मिळालीये. ही आग आज(27 ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास लागली. (Mumbai Fire) (Galaxy Hotel Fire Mumbai)

Mumbai Fire
Mumbai Fire
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 3:43 PM IST

Updated : Aug 27, 2023, 4:45 PM IST

मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागलीये. या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. आज दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरूयेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. (Mumbai Fire) (Galaxy Hotel Fire Mumbai)

  • Maharashtra | Three people died while two people were injured in a fire that broke out in the Galaxy Hotel in the Santacruz area of ​​Mumbai: Mumbai Police

    — ANI (@ANI) August 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार : अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, प्रभात कॉलनीतील गॅलेक्सी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली, त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अग्निशमन दलाच्या चार गाड्या, पाण्याचे टँकर मदत घटनास्थळी रवाना करण्यात आली. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

अग्निशमन दल घटनास्थळी - सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला आज दुपारच्या सुमारास आग लागली. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरुये.

तिघांचा मृत्यू - या आघीत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य पाच जण जखमी आहेत. जखमींना लगेच रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रूपल कांजी (वय 25 वर्ष), किशन (वय 28 वर्ष), कांतीलाल वारा (वय 48 वर्ष) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर अल्फा वाखरी या 19 वर्षीय महिला यात जखमी आहेत. तर इतर जखमींची नाव अद्याप समजू शकली नाहीत.

फर्निचरचे साहित्यही जळून खाक : मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांना आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी बाहेर पडण्यासाठी धावपळ सुरू केली. त्यामुळे काही काळ चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रुम नंबर 103, 203 मध्ये ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीमुळे खोल्यांमधील एसी युनिट, पडदे, गाद्या, लाकडी फर्निचरचे साहित्यही जळून खाक झालं आहे.

Last Updated : Aug 27, 2023, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.