मुंबई - शीख समुदायाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fir filed against actress kangana ranaut) मुंबईतील खार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (khar police station)
![fir filed against actress kangana ranaut](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/65-mh-mum-mh10066_23112021173513_2311f_1637669113_668.jpg)
काय आहे प्रकरण?
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शीख समुदायाविरुद्ध टिप्पणी केल्यानंतर वाद वाढला आहे. दिल्लीच्या शीख गुरुद्वारा व्यवस्थापनाने कंगनाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शीखांसाठी वापरल्या जाणार्या भाषा आणि कल्पनेबद्दल नाराजी व्यक्त केली. कंगनाने पोस्टमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वर्णन खलिस्तानी आंदोलन असे केले. (kangana ranaut statement regarding sikh community) एका शीख संघटनेने सोमवारी मुंबईत तक्रार दाखल करून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती.
![fir filed against actress kangana ranaut](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/65-mh-mum-mh10066_23112021173513_2311f_1637669113_586.jpg)
हेही वाचा - मलिक यांनी ट्विट केलेले 'ते' Whats App चॅट्स बनावट; क्रांती रेडकर यांची पोलिसात ऑनलाइन तक्रार
खार पोलिसांनी दिलेली माहिती -
खार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून (डीएसजीएमसी) तक्रार प्राप्त झाली आहे. आम्ही त्याचा तपास करत आहोत. ते म्हणाले की, शिरोमणी अकाली दल (एसएडी) नेते आणि डीएसजीएमसीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने कंगना रणौत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.