ETV Bharat / state

Mumbai Crime : ..अन् महिला पोलिस अधिकारी सापडली मोबाईल चोरासोबत हॉटेलमध्ये... - Investigation of female police sub inspector

एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मोबाईल चोरासोबत हॉटेलमध्ये आढळून आल्यानं खळबळ उडाली. या सहाय्यक महिला पोलीस निरीक्षकाला मोबाईल चोरावर कारवाई करण्यास सांगण्यात आलं होतं. या सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी सुरू असल्याची महिती अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील यांनी दिली.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 9:55 PM IST

Updated : Aug 27, 2023, 10:14 PM IST

मुंबई : महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पवईतील एका हॉटेलमध्ये मोबाईल चोरासोबत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली. या महिला पोलिसाला मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चोराला पकडण्यात टाळाटाळ करत असल्याचं आढळून आले.

पोलीस उपनिरीक्षक सापडली चोरासोबत : मुंबईतील एका पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या महिला पोलिसाने चोराला पकडण्याचं सोडून त्या थेट रजेवर गेल्या होत्या. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मोबाईल चोरासोबत सापडल्यानं पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

सहाय्यक महिला पोलीस निरीक्षकाची चौकशी पोलीस अधिकारी करत आहेत. चौकशी केल्यानंतरच अधिक माहिती देता येईल. - डॉ. महेश पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त

उपनिरीक्षक, आरोपीत अनेक कॉल्स : साबीर शेर अली सय्यद असे मोबाईल चोराचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींची ओळख पटवण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते. त्यानंतर त्याच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासले असता महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक, आरोपी यांच्यात संवाद झाल्याचे अनेक कॉल्सवरून लक्षात आले. खेरवाडी पोलीस आरोपीवर ठेवून असतानाच तो नवी मुंबईहून मुंबईत येत असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. मात्र, तो 'आरे' येथे येताच त्याचा मोबाइल बंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी पोलिसांनी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं. तेव्हा पोलिसांना महिला सहाय्यक निरीक्षक पवईतील एका हॉटेलमध्ये चोरासोबत असल्याचं आढळून आलं.

iPhone 14 Pro चोरट्यानी पळवला : 5 ऑगस्ट रोजी विलेपार्ले ते खेरवाडी दरम्यान दोन चोरट्यांनी एका तासात सात मोबाईल चोरल्याची घटना घडली होती. सातही मोबाईल रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चोरण्यात आले होते. तसेच खेरवाडी येथे रिक्षातून प्रवास करणाऱ्या एअर होस्टेसच्या हातातून iPhone 14 Pro मोबाईल चोरट्यानी पळवला होता. त्यामुळे तरुणीनं खेरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तपासादरम्यान आरोपी शीळ डायगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हेही वाचा -

  1. Haregaon News : शेळी चोरल्याच्या संशयातून मागासवर्गीय तरुणांना झाडाला उलटं बांधून मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
  2. Nashik Crime News : दारुच्या पार्टीत जिगरी मित्रांनीच केला मित्राचा खून; शहरात एका महिन्यात पाच खून
  3. Burglary In Phaltan : फलटणमध्ये भरवस्तीत घरफोडी, 20 तोळ्याच्या दागिन्यांसह 25 हजाराची रोकड लंपास

Last Updated : Aug 27, 2023, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.