मुंबई - पोलीस शिपाई, पोलीस चालक अशी एकूण 18 हजार पदांची भरती प्रक्रिया पोलीस दलात सुरू ( Police recruitment process started ) आहे. यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतची अखेरची तारीख देण्यात आली आहे. मात्र पोलीस भरती बाबत ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांना अनेक अडचणी समोर येत आहेत. बहुतेक वेळा ज्या ऑनलाइन साईट वरून फ्रॉम भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते ती साईडच हँग होत असल्याने उमेदवारांना फॉर्म भरता येत नाही.
फ्रॉम भरण्यात अडचणी - काही वेळा सर्व डाऊन सारख्या समस्याला देखील उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेची शेवटची तारीख वाढवून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. मात्र अजून पंधरा दिवस यामध्ये वाढवण्यात यावे अशी मागणी द्वारे धनंजय मुंडे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
18 हजार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू - काही दिवसापूर्वी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारकडून पोलीस दलामध्ये 18 हजार पदांची भरती केली जाईल अशी, घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस दलात शिपाई, चालक असे 18 हजार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या भरती प्रक्रियेत ऑनलाईन फॉर्म भरत असताना येणाऱ्या अडचणींमुळे तरुण उमेदवार यांना त्रास होतो आहे. त्यामुळे वेळेत अर्ज दाखल करण्यात येणाऱ्या अडचणीमुळेच फॉर्म भरून देण्याची तारीख पंधरा दिवसांनी वाढवावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.