ETV Bharat / state

पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

राज्यात एप्रिल व मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या कोविड-१९च्या परिस्थितीमुळे टाळेबंदी लागू केलेली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत मोठ्या अडचणी आल्या. या विचारात घेत शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Extension of crop loan recovery on July 31
पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ - मंत्री बाळासाहेब पाटील
author img

By

Published : Jul 2, 2021, 7:24 AM IST

मुंबई - राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी मुदतवाढ -

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्यात एप्रिल व मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या कोविड-१९च्या परिस्थितीमुळे टाळेबंदी लागू केलेली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत मोठ्या अडचणी आल्या. तसेच साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

व्याज सवलत योजनेसही पात्र -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ३० जूनपर्यंत करतात. अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते. या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.