मुंबई : 17 ते 25 ऑगस्ट या दरम्यान पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session of Maharashtra State Legislature ) होणार आहे. कोरोनाचा काळ संपला आहे. तसेच गेले चाळीस दिवस सत्तास्थापनेत गेले. लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे अधिवेशनाचे दिवस वाढवणे गरजेचे ( necessary to extend the days of the rainy session ) आहे. त्यानुसार पावसाळी अधिवेशन दोन ते तीन दिवसांनी वाढवावे ( extend monsoon session by two to three days ), अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे ( opposition partys demand on rainy session ). महाविकास आघाडी सरकार असताना कोरोनाचा काळ होता; मात्र आता तशी परिस्थिती नाही. तरीही राज्य सरकार जास्त काळ अधिवेशन घेण्याची टाळाटाळ करते असे दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil criticized state government on rainy session ) यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर केली.
कामकाज सल्लागार समितीमध्ये शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळावे - शिवसेनेच्या प्रतिनिधीला कामकाज सल्लागार समितीत घेतलं गेलं पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. शिवसेना अधिकृत पक्ष आहे. त्यांचा प्रतिनिधी कामकाज सल्लागार समितीवर असणं स्वाभाविक आहे. मात्र त्यांना का टाळलं हे लक्षात येत नाही. त्यामुळेच सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली असल्याची माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.
राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारचा अवैध - विधान परिषद विरोधी पक्ष नेत्यांच्या निवडीवरून भाव विकास आघाडी कोणतीही नाराजी नाही. महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. आजही महाविकास आघाडीच्या पक्षाची बैठक झाली. यामध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. नाना पटोले काय म्हणाले हे माहित. मात्र सध्या गरज आहे म्हणून सर्वच एकत्र आलेले आहे. भाजपला ज्यांना विरोध करायचा आहे ते पक्ष एकत्र आहेत. राज्यात सत्तेत आलेल सरकार अवैद्य असून, अवैद्य सरकारला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष मिळून एकत्र काम करत असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडणार- अधिवेशनात मांडण्यासाठी मुद्दे फार आहेत. ते सतरा तारखेपासून मांडण्यात येतील. राज्यात पूरग्रस्त जनतेच्या अधिक बिकट समस्या आहेत. त्या पूरग्रस्तांच्या मदतीला सरकार गेलेले नाही. अतिवृष्टीने शेतकरी बेजार झाला आहे. गॉगल गाईचं मोठे संक्रमण शेतकऱ्यांवर उभा राहिल आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ही फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच महागाईचा मुद्दा ही आहे. हे मुद्दे सर्व अधिवेशनात मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांची भेट- मुख्यमंत्रिपदावरून उतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांची भेट झाली नव्हती. शिवसेना पक्षांतर्गतही काही प्रश्न सोडवण्यात उद्धव ठाकरे यांचा ही बराच वेळ गेला. आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही भेटीची वेळ मागितली होती. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट झाली. या भेटीदरम्यान स्वतंत्र नंतर राज्यात घडणारी राजकीय परिस्थिती तसेच शिवसेनेचा सुरू असलेल्या कायदेशीर लढा याबाबत साधक-बाधक सर्व चर्चा झाली असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
मुख्यमंत्री सत्ता स्थापन करणे आणि सत्कार सोहळे घेणे यात मश्गुल - मागच्या काही दिवसात राज्यभरात पूरपरिस्थिती आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दहा ते बारा वेळा दिल्लीला जाऊन आले. या दौऱ्यामध्ये दोन्ही नेत्यांनी मदतीचा एक चकार शब्दही काढला नाही. बैठकही केली नाही. त्यांना केवळ मंत्रीमंडळ स्थापनेची चिंता होती. मंत्रिमंडळ स्थापनेच्या आधी त्यांच्यामध्ये वाद आहेत ते मिटवण्याची देखील चिंता होती. जनतेला वाऱ्यावर सोडून सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू होते. काल पासून वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचंड मोठा पाऊस सुरु झाला. काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता. या ठिकाणी एनडीआरएफचे टीम कार्यरत करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार सत्कारणी सोहळ्यातून मोकळा होईल आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडे लक्ष देईल असा टोमणाही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लगावला.
हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे गटाचा मंत्रिपदावर त्याग - मंत्रिमंडळ विस्ताराची शपथ झाली की रात्री लगेच खातेवाटप होत असत. मात्र अद्याप तसे झालेले नाही. त्यामुळे पहिल्यांदा मंत्री न झालेले एकनाथ शिंदे गटातील आमदार यांनी हिंदुत्वासाठी त्याग केला असल्याचे वाटत आहे. तसेच ज्यांना कमी महत्त्वाचं खातं मिळेल तो त्यांचा हिंदुत्वासाठी त्याग असेल असा चिमटाही जयंत पाटील यांनी काढला.
हेही वाचा - Achievements In Sports क्रीडा क्षेत्रात भारत देशाची प्रतिमा उंचावलेल्या भारतीय महिला