मुंबई - शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी ईडी विभागाने कार्यालयात येऊ नका, असा ईमेल पाठवला. तसेच मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीदेखील पवारांच्या बंगल्यावर येऊन तुम्ही ईडी कार्यालयात जाऊ नका, अशी विनंती केली. यामुळे शरद पवार यांची ताकद काय आहे, हे सर्वांनाच माहित आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.
हेही वाचा - पुण्यात आलेला पूर हा अनधिकृत बांधकामांमुळेच - चंद्रकांत पाटील
रोहीत पवार म्हणाले की, पवार साहेब ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांच्यावर नेमका कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याची माहिती घेण्यासाठी ठाम होते. पवार साहेब यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता जर कोणी त्यांच्यावर चिखल फेक करत असेल तर एक खासदार आणि नेता म्हणून त्यासाठीचा जाब विचारायला ते जाणार होते. मात्र, पोलीस अणि आयुक्त आदींनी त्यांना सांगितले असेल, त्यामुळे त्यांनी तिथे न जाण्याचा निर्णय बदलला असावा, असे रोहीत पवार म्हणाले.
हेही वाचा - शरद पवारांवर गुन्हा दाखल करणे ही राजकीय कृती - बाळासाहेब थोरात
मुंबई पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी पवार साहेबांची भेट घेऊन सांगितले की, आपल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि आलेल्या कार्यकर्त्यांमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना अडचण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर वेगळा निर्णय घेतला त्याचा फायदा लोकांना होऊ शकतो, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पवार साहेबांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय बदलला घेतला, असे रोहित पवार म्हणाले. तसेच आजच्या या आंदोलनानंतर पुढील धोरण आणि पक्षाची भूमिका ही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि आमचे नेते घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.