ETV Bharat / state

आज...आत्ता... सोमवारी संध्याकाळी 7 पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

author img

By

Published : Jun 17, 2019, 7:11 PM IST

कळंबोलीत सुधागड शाळेजवळ आढळला बॉम्ब? शाळेच्या पहिल्या दिवशीच खळबळ. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याबाबतचा निर्णय १९ जूनला. अमेझॉन फ्लेक्स, कुणालाही पार्ट-टाईम काम करत तासाला कमवता येतील १४०/- रुपये. सांगलीत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत.. थेट उंटावरून घरापासून शाळेपर्यंत शाही मिरवणूक. WC २०१९ : विराट सेनेवर सेलिब्रेटींकडून अभिनंदनाचा वर्षाव; 'भारत'नेही दिल्या शुभेच्छा.

आज...आत्ता... सोमवारी संध्याकाळी 7 पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

कळंबोलीत सुधागड शाळेजवळ आढळला बॉम्ब? शाळेच्या पहिल्या दिवशीच खळबळ

पनवेल - शाळेचा पहिला दिवस पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुतुहलचा दिवस ठरतो. मात्र, कळंबोली परिसरात असलेल्या सुधागड हायस्कुल शेजारी असलेल्या मैदानावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही वस्तू नक्की काय आहे? याची माहिती अद्याप मिळाली नाही. घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) दाखल झाले असून त्यांनी तपास सुरु केला आहे. वाचा सविस्तर

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याबाबतचा निर्णय १९ जूनला

मुंबई- नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मृत डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आता १९ जूनला निर्णय होणार आहे. वाचा सविस्तर

अमेझॉन फ्लेक्स, कुणालाही पार्ट-टाईम काम करत तासाला कमवता येतील १४०/- रुपये

हैदराबाद - अमेझॉन इंडियाने अमेझॉन फ्लेक्स ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पार्ट-टाईम डिलीव्हरीद्वारे प्रत्येक तासाला १४०/- रुपये कमावण्याची संधी आहे. वाचा सविस्तर

सांगलीत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत.. थेट उंटावरून घरापासून शाळेपर्यंत शाही मिरवणूक

सांगली - शाळेचा आजचा पहिला दिवस सांगलीच्या विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. कारण पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या मुलांचे शाही पद्धतीने स्वागत करण्यात आले. घरापासून शाळेपर्यंत उंटावरून मिरवणूक काढून मुलांना शाळेत घेऊन जाण्यात आले. सांगलीच्या कवलापूर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेने हा अभिनव उपक्रम राबवला. वाचा सविस्तर

WC २०१९ : विराट सेनेवर सेलिब्रेटींकडून अभिनंदनाचा वर्षाव; 'भारत'नेही दिल्या शुभेच्छा

मुंबई - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयामुळे सद्या खेळाडूंवर शुभेच्छाचा वर्षाव होत असून बॉलिवुड कलाकारांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. सलमान खान, अनिल कपूर, ऋषी कपूर आणि आयुष्यमान खुराना यासारख्या कलाकारांनी ट्विट करुन संघाचे अभिनंदन केले आहे. वाचा सविस्तर

Intro:पनवेल

पनवेल येथील कळंबोली परिसरात असलेल्या सुधागड हायस्कुलच्या शेजारी असलेल्या मैदानावर टायमर लावलेली बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. त्यामुळे ही वस्तू नक्की काय आहे? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याचा तपास कळंबोली पोलीस करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
Body:याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास कळंबोलीमधल्या सुधागड हायस्कुलच्या बाजूला एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. याठिकाणी आईस्क्रीम विक्रीसाठी असलेल्या एका हातगाडीवर एक बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवलेली तेथील सुरक्षारक्षकाला समजली. तसंच या वस्तूला टायमर देखील लावला असल्याचं दिसून आलं. थर्माकोल, प्लास्टिक आणि मेटल या वस्तूमध्ये टाकण्यात आल्याचं सुरक्षारक्षकाने सांगितलं आहे. ही बाब लागलीच तेथील सुरक्षारक्षकाने कळंबोली पोलीस स्थानकात सांगितल्यानंतर कळंबोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. Conclusion:याची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि बीडीडीएस दाखल झाल्यानंतर संबंधित संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आहे. त्याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ही वस्तू बाजूलाच असलेल्या स्मृती गार्डनमध्ये नेऊन निकामी करण्याचं काम सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.