मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; सहा जण ठार
पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक दुचाकी यांचा भीषण अपघात होऊन या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर..
गूढ उलगडले; भावी पत्नीनेच केली होती 'नवरदेवाची' हत्या, प्रियकरालाही अटक
भंडारा - लग्नाच्या आदल्या दिवशी हत्या झालेल्या नवरदेवाच्या हत्येचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे, या तरुणाच्या होणाऱ्या पत्नीनेच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रियकराच्या मदतीने हा हत्याकांड घडवून आणले असून पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. मात्र, हत्येशी निगडित बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. वाचा सविस्तर..
भिवंडी : वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडा, १५ लाख लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद
ठाणे - भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरांनी दानपेटीतून सुमारे १० ते १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. दरम्यान, दरोड्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाचा सविस्तर..
'कौमार्य चाचणी' न्याय वैद्यक अभ्यासक्रमातून होणार हद्दपार, डॉ. खांडेकरांच्या लढ्याला ९ वर्षांनंतर यश
वर्धा - कौमार्य चाचणी हे वैद्यकीय पाठ्यक्रमातून वगळण्यात येणार आहे. ही कौमार्य चाचणी शास्त्रीय असल्याचा समज होता. मात्र, त्याविरोधात वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी लढा सुरू केला होता. या लढ्याला तब्बल ९ वर्षांनी यश मिळाले आहे. हे यश जरी साधे वाटत असले तरी मागील १०० वर्षांपासून शिकवला जाणारा हा भाग आता वगळला जाणार आहे. त्यामुळे न्यायालयीन निकालावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच महिलांचे होणारे लैंगिक शोषणही थांबणार आहे. वाचा सविस्तर..
बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे ५ टक्के कमीशन मागतील, निलेश राणेंचा निशाणा
मुंबई - बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे ५ टक्के कमीशन मागतील, अशी खोचक टीका माजी खासदार निलेश राणेंनी केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याची माहिती समोर आली होती. वाचा सविस्तर..
आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर... - Bulletin
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. भंडारा जिल्ह्यातील खूनाचे गुढ उलगडले असून भावी पत्नीनेच नवरदेवाची हत्या केली होती, या प्रकरणी प्रियकरालाही अटक करण्यात आली आहे. भिवंडीतील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून १५ लाख रुपये लंपास केले. कौमार्य चाचणी' न्याय वैद्यक अभ्यासक्रमातून हद्दपार होणार आहे. बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे ५ टक्के कमीशन मागतील अशी टीका निलेश राणे यांनी केली.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; सहा जण ठार
पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक दुचाकी यांचा भीषण अपघात होऊन या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर..
गूढ उलगडले; भावी पत्नीनेच केली होती 'नवरदेवाची' हत्या, प्रियकरालाही अटक
भंडारा - लग्नाच्या आदल्या दिवशी हत्या झालेल्या नवरदेवाच्या हत्येचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे, या तरुणाच्या होणाऱ्या पत्नीनेच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रियकराच्या मदतीने हा हत्याकांड घडवून आणले असून पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. मात्र, हत्येशी निगडित बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. वाचा सविस्तर..
भिवंडी : वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडा, १५ लाख लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद
ठाणे - भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरांनी दानपेटीतून सुमारे १० ते १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. दरम्यान, दरोड्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाचा सविस्तर..
'कौमार्य चाचणी' न्याय वैद्यक अभ्यासक्रमातून होणार हद्दपार, डॉ. खांडेकरांच्या लढ्याला ९ वर्षांनंतर यश
वर्धा - कौमार्य चाचणी हे वैद्यकीय पाठ्यक्रमातून वगळण्यात येणार आहे. ही कौमार्य चाचणी शास्त्रीय असल्याचा समज होता. मात्र, त्याविरोधात वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी लढा सुरू केला होता. या लढ्याला तब्बल ९ वर्षांनी यश मिळाले आहे. हे यश जरी साधे वाटत असले तरी मागील १०० वर्षांपासून शिकवला जाणारा हा भाग आता वगळला जाणार आहे. त्यामुळे न्यायालयीन निकालावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच महिलांचे होणारे लैंगिक शोषणही थांबणार आहे. वाचा सविस्तर..
बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे ५ टक्के कमीशन मागतील, निलेश राणेंचा निशाणा
मुंबई - बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे ५ टक्के कमीशन मागतील, अशी खोचक टीका माजी खासदार निलेश राणेंनी केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याची माहिती समोर आली होती. वाचा सविस्तर..
dummy
Conclusion: