कोलकाता - पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी इथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १३ जण ठार झाले आहेत. ट्रकने मारूती व्हॅन आणि टाटा मॅजिकला धडक दिल्याने हा अपघात झाला. जलपाईगुडी जवळील राष्ट्रीय महामार्ग ३१ वर हा अपघात झाला. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहेत.
सविस्तर वाचा - पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; 13 जण ठार, ट्रकने दिली दोन गाड्यांना धडक
मुंबई - मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. यापूर्वी ही सुनावणी २५ जानेवारीला निर्धारित करण्यात आली होती. मात्र,आता सुप्रीम कोर्टात हे प्रकरण बुधवारी म्हणजेच २० जानेवारीला लिस्ट झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील सुनावणी उद्यापासून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे.. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सविस्तर वाचा - मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आजच सुनावणी
वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आज (बुधवार) पदाची शपथ घेणार आहेत. सोबतच उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस शपथ घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी आज ते अधिकृत रित्या पदावरून पायऊतार होतील.
सविस्तर वाचा - जो बायडेन आज घेणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ
सातारा - सातारा-पंढरपूर रस्त्यावर पिलीव घाटात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये ४ ते ५ वाहनांच्या काचा फुटल्या असून वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यात माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समजते.
सविस्तर वाचा - पिलीव घाटात लुटमारीच्या उद्देशाने वाहनांवर दगडफेक; कोंबिंग ऑपरेशन लवकरच
मुंबई - दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
सविस्तर वाचा - मुंबईतील शेतकरी आंदोलनात शरद पवार राहणार उपस्थित राहणार - नवाब मलिक
मुंबई - मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्याचे विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव चर्चेत असून त्यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्यापही काँग्रेसच्या वरिष्ठांकडून कोणताही शिक्कामोर्तब करण्यात आला नसल्याची माहिती देण्यात आली.
सविस्तर वाचा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर; मात्र निर्णय लांबणीवर
मुंबई- पाकिस्तानवर केलेले सर्जिकल स्ट्राइक किंवा पुलवामा हत्याकांडानंतर पाकिस्तानवर केलेले एअर स्ट्राइक याचे पुरेपूर भांडवल आणि मार्केटिंग करणारे चिन्यांच्या नवीन घुसखोरीबाबत मिठाची गुळणी धरून बसणार नाहीत, अशी जनतेला अपेक्षा आहे. 'अब आँखो में आँखे डालकर बात होगी', असे एका ओळीचे परराष्ट्र धोरण खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच जाहीर केले आणि ते गाजलेही खूप. त्याच विधानाला जागून भारतात चिनी गाव उभारणाऱया चिन्यांविरुद्ध पंतप्रधान नक्कीच एखादा 'मास्टरस्ट्रोक' मारतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाही असे सांगत अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार? असा प्रश्न शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून थेट मोदींनाच केला आहे. शिवाय जेंव्हा हे गाव उभारले जात होते तेंव्हा आपले प्रधान सेवक, चौकीदार वगैरे म्हणवणारे शक्तिशाली सरकार काय करत होते ? असा खडा सवालही करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त - ...तेंव्हा आपले प्रधान सेवक, चौकीदार वगैरे म्हणवणारे शक्तिशाली सरकार काय करत होते ?
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दौरा संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध रणशिंग फुंकणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ४ कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी १८ सदस्यीय भारतीय संघात इशांत शर्माचे पुनरागमन झाले आहे.
सविस्तर वृत्त - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, 'महत्त्वाच्या' खेळाडूचे पुनरागमन
मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माते साजिद खान यांच्यावर आणखी एक आरोप झाला आहे. हा आरोप बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने केला आहे. साजिदने ६ वर्षापूर्वी भेटीदरम्यान केलेल्या कृत्याचे कथन शर्लिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यात तिने साजिदने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
सविस्तर वृत्त - अभिनेत्री शर्लिन चोप्राचा साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप
नागपूर - मागील काही दिवसांपासून बर्ड फ्ल्यूचे संकट घोंघावत होते. अखेर हे संकट नागपूर जिल्ह्यात पोहचले आहे. नागपूरच्या ग्रामीण परिसरात काही भागात मृत पक्षी आढळून आले होते. बुट्टीबोरी परिसरातील वारंगा येथील फार्म हाऊसवरील मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आले आहे. यात पूर्व विदर्भात नागपूर नंतर गडचिरोली जिल्ह्यातही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. मात्र यापासून घाबरण्याचे कारण नसल्याचेही सांगितले जात आहे.
सविस्तर वृत्त - नागपूर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव