गृह राज्यमंत्र्यांसमोरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, ३८ वर्षांपासून वीज कनेक्शनसाठी सुरू आहे संघर्ष
बुलडाणा - तब्बल ३८ वर्षांपासून शेतात वीज कनेक्शन मिळत नसल्याने जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मलकापूरमधील कृषी प्रदर्शनी मेळाव्यात, राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या समोर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १५ जूनला संध्याकाळी घडली. ईश्वर खुपराव खराटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हेही वाचा...
डॉक्टरकडून परिचारिकेचे लैंगिक शोषण, जिंतूर तालुक्यातील घटना
परभणी - डॉक्टरकडून गेल्या २ वर्षांपासून लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार एका परिचारिकेने जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. हा प्रकार जिंतूर तालुक्यातील येलदारीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्र पिंपळगाव (का) येथील आहे. डॉ. तौसीफ हुसेन अन्सारी असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. हेही वाचा...
राजस्थानच्या सुमन रावला 'मिस इंडिया २०१९' चा किताब
नवी दिल्ली - सौदर्यंस्पर्धेत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या मिस इंडिया स्पर्धेचा शनिवारी रात्री निकाल जाहीर झाला. यामध्ये राजस्थानच्या सुमन रावने 'मिस इंडिया २०१९ चा किताब पटकाविला आहे. हेही वाचा...
मंत्रिमंडळाचा आज विस्तार, १३ जणांचा होणार शपथविधी
मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रलंबीत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. यामध्ये १३ जणांना नव्याने मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर १३ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यामध्ये विद्यमान काही मंत्र्यांना नारळ देण्यात येणार आहे. हेही वाचा...
ICC World Cup 2019 : भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबला', भारताला विजयी परंपरा राखण्याचे आव्हान
लंडन - भारत विरुध्द पाकिस्तानचा 'महामुकाबला' आज रंगणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेतील भारत विरुध्द पाकिस्तान या हायहोल्टेज सामन्याला सुरुवात होण्यास मोजकेच तास शिल्लक राहिले आहेत. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. हेही वाचा...