ETV Bharat / state

Daya Nayak Journey : वेटर ते एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक; नाम ही काफी था...

गुंडांना धडकी बनवणारा एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाल्याने पोलीस खात्यात चर्चांचे वावडे उठले आहेत. सर्वसामान्य घरात जन्मलेले दया नायक यांचा पोलीस खाकी पर्यंतच्या प्रवास कसा होता. त्याबाबत अधिक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

author img

By

Published : Apr 19, 2023, 4:14 PM IST

Daya Nayak
Daya Nayak

मुंबई : मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक दया नायक यांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणजेच चकमक फेम म्हणून ओळख आहे. दैनिक यांचे 1995 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी प्रदीप शर्मा यांच्यासोबत मुंबई क्राईम ब्रांचमध्ये काम सुरू केले. प्रदीप शर्मा यांच्या एन्काऊंटर पथकात दया नायक यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान दया नायक यांनी जवळपास 80 गुंडांचा खात्मा केला.

आठ वर्षांपर्यंत वेटर : मूळचे कर्नाटकातील असलेले दया नायक त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. दया नायक यांनी सातवीपर्यंत शाळा शिकल्यानंतर ते 1979 ला मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर एका हॉटेलमध्ये दया नायक वेटर म्हणून काम करत होते. हॉटेलचा मालक दया नायक यांना पगार देत असत. त्याच हॉटेलच्या माणसाने दया नायक यांना पदवीपर्यंत शिकवले. दरम्यान पोलिसात नोकरी लागण्याआधी आठ वर्षांपर्यंत दया नायक यांची वेटर म्हणून नोकरी सुरूच होती. दया नायक यांनी काही दिवसांपर्यंत 3 हजार रुपये प्रति महिना रोजंदारीवर नोकरी केली.

दिवसा काम आणि रात्री शिक्षण : दया नायक हे मूळचे कर्नाटकातले असून त्यांचा उडपी जिल्ह्यात मंगलोरजवळच्या यन्नेहोळे गावात कोकणी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण येन्नेहोळे येथेच गेलं. दया नायक तिथे कन्नड शाळेत जात होते. वयाच्या 12 व्या वर्षी ते गाव सोडून मुंबईत आले. त्यांचे वडील,भावंड त्यांच्या आईला सोडून अचानक गायब झाले. नंतर दया नायक यांच्या आईने मुंबईला आल्यावर मिळेल तिथे घरकाम करायला सुरुवात केली. कुटुंबाला हातभार लावायला हवा म्हणून दया हे लहान वयातच कामाला लागले. रात्र रेल्वे प्लॅटफॉर्म वर काढायची.

1995 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणुन निवड : तिथेच झोपायचं नंतर रेल्वे कँटीनमध्ये काम करायचे. काही दिवसांनी दया नायक यांना अंधेरीतील वर्सोव्यातल्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी लागली. वेटरची नोकरी करतच त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं होतं. हॉटेल मालकाने दया नायक यांच्या शिक्षणाची हमी घेतली. अशा पद्धतीने दया नायक यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांनी विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं. दिवसा काम आणि रात्री शिक्षण अशी मेहनत करत त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केला आणि नंतर एमपीएससी परीक्षा देऊन पोलीस खात्यात जाण्याचे आपले स्वप्न सत्यात उतरवले. या नायक यांची पहिली पोस्टिंग 1995 मध्ये जुहू पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस पोलीस निरीक्षक दया नायक यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा - BRS Meeting: बीआरएस सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, सभा स्थळ बदलून होणार सभा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.