ETV Bharat / state

Eknath Shinde to visit Germany : विरोधकांच्या सततच्या टीकेनंतर 'या' कारणानं मुख्यमंत्री करणार जर्मनीचा दौरा

राज्यातील महामार्गांवरील विशेषत: समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता अपघातप्रवण प्रणालीची माहिती घेण्याकरिता मुख्यमंत्री बर्लिनला जाणार आहेत. त्यांच्यासमवेत विविध विभागांचे मंत्रीदेखील जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Eknath Shinde to visit Germany
Eknath Shinde to visit Germany
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 5:44 PM IST

मुंबई - राज्यातील महामार्गांवरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. समृद्धी महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण वाढले असताना विरोधकांकडूनसुद्धा सरकारवर टीकास्त्र सोडलं जात आहे. याच परिस्थितीसह उपाययोजना करण्यासाठी जर्मनी, बर्लिन येथील अद्यावत अपघातप्रवण प्रणाली जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यासहित इतर विभागाचे मंत्री हे जर्मनी दौऱ्यावर जाणार आहेत.

बर्लिन दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लंडनला जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी जी वाघनखे वापरली होती ती भारतात आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगटीवर यांनी यापूर्वीच हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत ही वाघनखे परत आणण्यासाठी ३ ऑक्टोंबर रोजी याबाबत लंडन येथे करारसुद्धा केला जाणार आहे. हा करार करताना मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे राज्याभिषेकाचं 350 वं वर्ष असताना मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा वारसा सांगणारी जगदंब तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी ब्रिटन सरकारबरोबर राज्य सरकारनं पत्रव्यवहार केला आहे.

दौऱ्याची अंतिम रूपरेषा आखण्यासाठी तयारी सुरू- मुख्यमंत्र्यांच्या जर्मनी दौऱ्यासंदर्भात राज्य सरकारने जर्मनीतील दूतावासाशी संपर्क साधला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री लंडनंतर जर्मनीला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रालयामध्ये या दौऱ्याची अंतिम रूपरेषा आखण्यासाठी तयारी सुरू आहे. लवकरच हा दौरा निश्चित केला जाणार आहे. या संदर्भातील माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्यासाठी किती फायदेशीर दौरा- मुख्यमंत्र्यांच्या जर्मनी व लंडन या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत उद्योग विभागाचे मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, एमएसआरडीसी, एमआयडीसीचे अधिकारी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर बर्लिनमध्ये उभारण्यात आलेल्या फ्री वेची रचना कशा पद्धतीची आहे? याची पाहणी करून, त्याचे व्यवस्थापन, देखभाल आदी गोष्टींचा सुद्धा या दौऱ्यात अभ्यास केला जाणार आहे. जर्मनीमध्ये या सर्व उपाययोजनांचा अभ्यास केल्यानंतर त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातील महामार्गावर करता येईल का? याची चाचपणी सुद्धा यादरम्यान केली जाणार असल्याने हा दौरा राज्यासाठी किती फायदेशीर ठरतो हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा-

  1. Tiger Cub Name Controversy : सत्ताधाऱ्यांना 'आदित्य' नावाचा तिरस्कार? वाघाच्या नावाची चिठ्ठी बदलली; संभाजीनगरात नेमक काय घडंल?
  2. Wagh Nakhe Jagadamba Sword : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लवकरच येणार मायभूमीत; मंत्री मुनगंटीवारांची 'ETV भारत'ला Exclusive माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.