ETV Bharat / state

NCP Accuses Governor : महाविकास आघाडीला राज्यपालांकडून सातत्याने दडपण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादीचा राज्यपालांवर आरोप - NCP accuses the Governor

महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadi ) राज्यपाल सतत दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तसेच महापुरुषांचा वारंवार अवमान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshari ) यांना पदावरून हटवले जात नसल्याचे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Nationalist Congress ) म्हणणे आहे. तसेच हा विषय केंद्राकडे असल्याचे वचिंत बहूजन आघाडीचे ( Wachint Bahujan Alliance ) म्हणणे आहे.

NCP Accuses Governor
राष्ट्रवादीचा राज्यपालांवर आरोप
author img

By

Published : Jan 4, 2023, 3:37 PM IST

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोशारी ( Governor Bhagat Singh Koshari ) यांना पदवरुन हटवण्यासाठी महाविकास आघाडीने ( Mahavikas Aghadi ) भव्य मोर्चा काढला होता. राज्यपालांना पदावरून हटवावे ( NCP demands Governor be removed ) यासाठी विधानसभेतही जोरदार निदर्शने करण्यात आली मात्र, तरीही राज्यपालांना पदावरून हटवले जात नाही. राज्यपालांच्या विरोधात नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही ( Winter session ) आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली. मात्र त्याचाही परिणाम झालेला दिसत नाही. राज्यपालांना पदावरून का हटवले जात नाही, यासंदर्भात विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त,र हा केंद्राचा प्रश्न असल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यपालांनी दिला महाविकास आघाडाला त्रास - या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरत चव्हाण ( NCP spokesperson Surat Chavan ) म्हणाले की राज्यपाल भगतसिंह कोशारी ( Bhagat Singh Koshari ) यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये सरकारला केवळ त्रास देण्याचे काम केले आहे. सरकारच्या अनेक निर्णयांना त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीवरही त्यांनी निर्णय घेतला नाही. राज्यपालांनी सातत्याने भाजपाची बाजू घेतली. वास्तविक राज्यपालांसारख्या पदावर बसलेल्या व्यक्तीने राज्याच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असते. तसेच राष्ट्र पुरुषांचा मान राखणे ही अपेक्षित आहे. मात्र, त्यांनी संघाच्या विचारसरणी प्रमाणे राष्ट्र पुरुषांचा सातत्याने अपमान केला आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यांना पदावरून हटवल जात नाही. याचे कारण त्यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या त्रासाचे हे बक्षीसच आहे, असा आरोप सुरज चव्हाण यांनी केला आहे.

निर्णय केंद्रावर अवलंबून - या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, वास्तविक महापुरुषांचा अपमान झाला असे आपण म्हणतो, हे जरी सत्य असले तरी त्याच व्यासपीठावर शरद पवार हे सुद्धा विराजमान होते. त्यांच्या उपस्थितीत कोशारी यांनी हे वक्तव्य केले. पवार यांना त्यावेळी महापुरुषांचा अवमान वाटला नाही. मात्र, त्यांच्या पक्षातील इतरांना तो कसा काय वाटतो? असा प्रश्न उपस्थित करीत राज्यपालांना हटवणे ही बाब केंद्राच्या आखरीत असल्याने कोणताही मोर्चा काढून राज्यपालांना हटवले जात नाही अशी, प्रतिक्रिया आंबेडकर यांनी व्यक्त केली.

राज्यपालाला भाजपचे छुपे पाठबळ - एकूणच महाविकास आघाडीने प्रयत्न करूनही राज्यपालांना हटवले जाणार नाही. कारण राज्यपाल हे भाजपला अपेक्षित असलेला अजेंडा राबवत आहेत. बहुजनांच्या राष्ट्रपुरुषांना कमी लेखनाचा यापूर्वीही संघाने प्रयत्न केला आहे. तोच अजेंडा राज्यपाल राबवत असल्याने त्याला भाजपचे छुपे पाठबळ आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.