ETV Bharat / state

दहावीच्या वाढीव 20 गुणांबाबत शिक्षण तज्ञांचे मत घेणार, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण - 10th class

पुढील वर्षी पुन्हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव २० गुण देण्याच्या निर्णयावर शिक्षण तज्ञांचे मत घेणार असल्याचे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केले. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दहावीचे वाढीव २० गुण पुढील वर्षी देण्याचे आश्वासन दिले आहे.

विनोद तावडे
author img

By

Published : Jun 13, 2019, 9:00 PM IST

मुंबई - पुढील वर्षी पुन्हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव २० गुण देण्याच्या निर्णयावर शिक्षण तज्ञांचे मत घेणार असल्याचे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केले. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दहावीचे वाढीव २० गुण पुढील वर्षी देण्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे विनोद तावडेंनी यावर शिक्षण तज्ञांचे मत घेणार असल्याचे सांगितल्याने, मंत्रिमंडळातच ताळमेळ नसल्याचे उघड झाले.

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने पुन्हा वाढीव २० मार्क देण्याची पद्धत सुरू करावी, अशी मागणी होत आहे. ही मागणी घेऊन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे मात्र तोंडावर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळेच तावडेंना आज पत्रकार परिषद घ्यावी लागल्याची चर्चा आहे.

विनोद तावडे

यावेळी दहावीचा निकाल कमी लागला आहे. वाढीव २० गुण कमी केल्यामुळे टक्केवारी कमी झाल्याचे कारण पुढे आले आहे. हे वाढीव २० गुण पुढील वर्षीच्या शैक्षणिक कार्यकाळात पुन्हा देण्यात येतील, असे आश्वासन फडवणीस यांनी आदित्य ठाकरेंना दिले होते. मात्र, निकाल लागला तेव्हा शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी आम्ही टक्केवारीला लागलेली सूज कमी केली, अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती.

Intro:मुंबई ।
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दहावीचे वाढीव 20 गुण पुढील वर्षी पुन्हा देण्याचे आश्वासन दिले असताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मात्र याबाबत शिक्षण तज्ञांचे मत घेऊ असे वक्तव्य केले आहे. यावरून मंत्रिमंडळातच ताळमेळ नसल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने पुन्हा वाढीव 20 मार्काची पद्धत सुरू करावी, अशी मागणी होत आहे, ही मागणी घेऊन युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे मात्र तोंडावर पडल्याचे चित्र आहे. यामुळेच तावडे यांना आज पत्रकार परिषद घ्यावी लागल्याची चर्चा आहे. Body:महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल हा अपेक्षेप्रमाणे कमी लागला आहे. यानंतर वाढीव 20 मार्क ( ग्रेस मार्क) कमी केल्यामुळे टक्केवारी कमी झाल्याचे कारण पुढे आले आहे. यावर काही तोडगा काढावा यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा केली होती व हे वाढीव 20 मार्क पुढील वर्षीच्या शैक्षणिक कार्यकाळात पुन्हा देण्यात येतील, असे आश्वासन फडवणीस यांनी ठाकरे यांना दिले होते. मात्र निकाल लागला तेव्हा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आम्ही टक्केवारीला लागलेली सूज कमी केली, अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती.
आता मुख्यमंत्र्यांनी या प्रक्रियेत लक्ष घातल्याने तावडे यांनी आम्ही ग्रेस मार्क पुढील वर्षीच्या अभ्यासक्रमात द्यायचे की नाही, याबाबत शिक्षण तज्ञांचे मत घेणार आहोत अशी प्रतिक्रिया आज दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.