मुंबई - नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर फक्त ट्विट करून शिवसेना गप्प बसू शकत नाही. त्यांनी सांगितले पाहिजे, की त्यांना सत्ता पाहिजे की सावरकर, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी शिवसेनेला केला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात आज (15 डिसेंबर) 4 वाजता भाजपतर्फे बोरिवलीतील सावरकरांच्या स्मारकापासून ते दादरच्या स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हुसेन बोलत होते.
राज्यात शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली असल्याचा आरोपही हुसेन यांनी केला आहे. हुसेन म्हणाले,"लोकसभेत शिवसेनेने नाकरिकत्व सुधारणा बिलाच्या बाजुने मतदान केले. शिवसेना कायमच घुसखोरांच्या विरोधात राहिली आहे. मात्र राज्यसभेत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. उद्धव ठाकरे नेमके कुणाच्या दबावाखाली आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे"
हेही वाचा - 'गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना माना, ही कसली सौदेबाजी?'
नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी बोलताना हुसेन म्हणाले, "हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे. काँग्रेसने या कायद्याविषयी देशात भ्रम निर्माण केला आहे. काँग्रेसने ईशान्येकडील राज्यांना भडकावण्याचे काम केले आहे. हे नागरिकत्व घेणारे नाही तर, नागरिकत्व देणारे विधेयक आहे"