मुंबई : दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला डॉक्टरचा लैंगिक छळ ( Dindoshi Police Handcuffs Doctor ) आणि धमकी दिल्याप्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात डॉक्टरच्या विरोधात तक्रार दाखल केली ( Doctor For Sexually Harassing a Woman ) होती. त्यानुसार दिंडोशी पोलीस आणि आयपीसी कलम 354(A)(3), 500, 504, 506, 509 आणि आयटी कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मैत्री झाल्यानंतर दोघांमध्ये जवळचे संबंध दिंडोशी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी असलेल्या महिला डॉक्टरची आरोपी डॉक्टरशी मैत्री होती आणि हे दोघेदेखील बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून काम करत होते. मैत्री झाल्यानंतर दोघांमध्ये जवळचे संबंध निर्माण झाले होते. त्यातून पैशांची दिवाण-घेवाण दोघांमध्ये झाली होती. तक्रारदार महिला डॉक्टरकडून आरोपी डॉक्टरने पैसे घेतले होते. ते पैसे परत देण्यासाठी महिला डॉक्टरने आरोपी डॉक्टरकडे तगादा लावला होता.
महिला डॉक्टरने पैसे मागण्याचा दगादा सुरूच ठेवला आरोपी डॉक्टर पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. तरीदेखील फिर्यादी असलेल्या महिला डॉक्टरने पैसे मागण्याचा दगादा सुरूच ठेवला होता त्यानंतर आरोपी डॉक्टरने महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तिचे फोटो मोर्फ करून अश्लील बनवून वायरल केले गेले. त्यानंतर महिला डॉक्टर आणि आरोपी डॉक्टर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्या भांडणात आरोपी डॉक्टरने महिला डॉक्टरला शिवीगाळदेखील केली.
महिला डॉक्टरची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार घडलेल्या प्रकारानंतर महिला डॉक्टरने काल रात्री दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महिला डॉक्टरच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून काल रात्रीच अटक केली. आज आरोपी डॉक्टरला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास दिंडोशी पोलीस करत आहेत.