देहू (पुणे) Dhirendra Shastri at Tukaram Maharaj Temple : संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळं अडचणीत आलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री अखेर संत तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळी चरणी लीन झाले. पुण्यात कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांना संत तुकाराम महाराजांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळं विरोध होत होता. त्यानंतर त्यांनी पुण्यात दाखल होताच पत्रकार परिषदेत संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दोनदा माफी मागितली.
भारतात राहून केणत्याही संतांची अवहेलना करणार नाही : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे नेहमी आपल्या विविध वक्तव्यांवरून चर्चेत असतात. त्यांनी काही महिन्यापुर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र पुण्यातील आयोजित कार्यक्रमात त्यांना यामुळं विरोध करण्यात येत होता. त्यामुळं त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून दोन वेळा माफी मागितलीय. पुण्यात असतांना धीरेंद्र शास्त्रींनी आज देहू नगरीत येऊन संत तुकाराम महाराज मंदिरात नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना शिवाजी महारांजांच्या संकल्पनेतील हिंदू राष्ट्र व्हावं अशी प्रार्थना संत तुकाराम महाराजांच्या चरणी केल्याचं सांगितलंय.
जेवढी माहिती संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्याबद्दल वाचली होती, त्यावरुन मी विधान केलं होतं. मात्र त्यानंतर मला जाणवलं की, वारकरी संप्रदायाचे लोकं नाराज झालेत. त्यामुळं मी यावर व्हिडिओच्या माध्यमातून दिलगिरीदेखील व्यक्त केली. भारतात राहून कोणत्याही संतांची अवहेलना करणार नाही-धीरेंद्र शास्त्री
संत तुकाराम महाराज देवासमान : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा मी आदर करतो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना मी देवासमान मानतो. देहू येथील मंदिरात जाऊन मी दर्शन घेतले. संतांना कोणीच विरोध करु शकत नाही, असंही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं. धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. तसंच देहू संस्थानच्या वतीनं धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा सत्कारही करण्यात आलाय.
हेही वाचा :
- Bageshwar Dham Baba Got Y Security : बागेश्वर धाम बाबांना वाय श्रेणीची सुरक्षा बहाल, 8 जवान राहणार तैनात; मध्यप्रदेश सरकारचा आदेश जारी
- Bageshwar Baba On Bajrang Bali : बजरंग बलीला विरोध करण्याचा अधिकार कोणालाच नाही - बागेश्वर बाबा
- Case Against Bageshwar Dham : देवाचा अवतार सांगून फसवणूक केल्याचा आरोप; बागेश्वर बाबाविरोधात गुन्हा दाखल