ETV Bharat / state

अजित पवार यांच्यावर विश्वास का ठेवायचा? -प्रकाश शेंडगे - mumbai news

धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आरक्षणासंदर्भात सरकारवर टीका केली. ते ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीकडून आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Press Committee of OBC, VJNT Struggle Committee
ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समिती पत्रकार परिषद
author img

By

Published : Oct 31, 2020, 2:24 PM IST

मुंबई - राज्यातील मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. त्यामुळे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना समितीचे अध्यक्षपद का दिले नाही, असा प्रश्न धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला. या समितीचे कामकाज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली चालणार असल्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास का ठेवावा, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीकडून आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश शेंडगे बोलत होते.

राज्यात ओबीसी समाजाच्या विकासासाठी महाज्योती संस्थेचे अजूनही कामकाज सुरू झाले नाही. शिवाय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आमच्या एकाही विषयावर निर्णय झाला नाही. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून जो न्याय सारथीला दिला जात आहे. तो न्याय ओबीसी समाजाला का दिला जात नाही, असा सवाल करत शेंडगे यांनी सरकारवर टीका केली.

नाहीतर राज्यात उद्रेक होईल

मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, यासाठी आमचे समर्थन आहे. मराठा नेत्यांना आरक्षण मिळणार नाही, हे लक्षात आल्याने ते ओबीसी कोट्यातून आरक्षण मागत आहेत. मात्र, असा कोणताही प्रस्ताव सरकारने पारित करू नये. नाहीतर राज्यात उद्रेक होईल, असा इशारा शेंडगे यांनी दिला.

तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही

राज्यात आज ७२ हजार नोकऱ्यांची मेगाभरती थांबली आहे. मराठा समाजाला १३ टक्के जागा वेगळ्या ठेवून इतर जागा भराव्यात, अशी मागणीही यावेळी शेंडगे यांनी केली. आज लाखो विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबले आहेत. मात्र हे सर्व केवळ मराठा समाजासाठी होत असेल तर आम्ही एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा शेंडगे यांनी दिला.

३ तारखेला राज्यभर आंदोलन

आम्ही 'ओबीसी'चे जराही आरक्षण मराठ्यांना देणार नाही. त्यामुळे आम्ही ३ तारखेला राज्यभरात आंदोलन करणार आहोत. याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल असा इशाराही ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीकडून देण्यात आला.

हेही वाचा- शेतकऱ्यांच्या मदतीपूर्वी शेतमजुरांना मदत द्या, अन्यथा न्यायालयात जावू - ॲड. सदावर्ते

हेही वाचा-काळ्या फिती लावून मंत्रिमंडळ देणार सीमावासीयांना पाठिंबा- एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.