ETV Bharat / state

राज्य सरकारचा कारभार पाहून 'रामगढ के शोले' ची आठवण, धनंजय मुंडेंची सरकारवर खोचक टीका - vidhanparishad

दुष्काळात राज्य सरकारचा कारभार आम्ही पाहीला असून, त्यावरुन 'रामगढ के शोले' चित्रपटाची आठवण होत असल्याचे खोचक वक्तव्य करत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकारवर टीका केली.

धनंजय मुंडेंची सरकारवर खोचक टीका
author img

By

Published : Jun 19, 2019, 5:48 PM IST

मुंबई - दुष्काळात राज्य सरकारचा कारभार आम्ही पाहीला असून, त्यावरुन 'रामगढ के शोले' चित्रपटाची आठवण होत असल्याचे खोचक वक्तव्य करत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकारवर टीका केली. राज्यपाल महोदयांच्या बद्दल आदर असता तर त्यांच्या तोंडी खोट्या गोष्टी घातल्या नसत्या असेही मुंडे म्हणाले.

विधानपरिषदेत बोलताना धनंजय मुंडेंनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अमीर खानने चौकीदाराची संगीतलेली गोष्ट सांगत सरकारची खिल्ली उडवली. चौकीदार रात्री सगळयांना ऑल इज वेल म्हणायचा,पण तो आंधळा होता. असेच भाषण या आंधळ्या सरकारने केले असल्याचे मुंडे म्हणाले.

राज्यपालांच्या भाषणातून कोणतेही दिशादर्शन झाले नाही. शेतकरी, बेरोजगार यांची निराशा झाली आहे. धनगर, मराठा, मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असल्याचे मुंडे म्हणाले.

पाकिस्तानला अनेकदा धुळ चारली पण राजकारण केले नाही

शहिदांच्या नावाने तुम्हाला मत मागावे लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना पाकिस्तानला आम्ही अनेकदा धूळ चारली पण त्याचे राजकारण केले नसल्याचे मुंडे म्हणाले. पैसे, ईव्हीएम मॅनेज करून पुढे विधानसभा जिंकू असे समजत असाल तर तुम्ही मूर्खांच्या नंदनवनात राहता असेही मुंडे म्हणाले.

दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत

साडेचार वर्षात वादे पूर्ण करता आले नाहीत, म्हणून आता २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना दाम दुप्पट करण्याचे वादे पूर्ण करण्यासाठी मुदत दिली जात आहे. शेतकरी सरकारच्या विरोधात पत्र लिहून आत्महत्या करत आहेत. दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारची आधारभूत योजना फसली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तूर, उडीद याचे पैसे सरकराने दिले नाहीत. तरीही सरकार ऑल इज वेल म्हणत असल्याचे मुंडे म्हणाले.

आज कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहे. त्याला 1400 कोटी रुपये अनुदान द्यायचे असताना केवळ 104 कोटी दिले आहेत. जलयुक्त शिवारमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. 22 हजार खेडी दुष्काळमुक्त केली तर मग ही कामे कुठे केली असा सवालही मुंडेनी यावेळी केला.

72 हजार जागा भरण्याचे जाहीर करून 8 महिने उलटले तरी अद्याप एकही जागा भरली नाही. त्याचीही खोटी माहिती राज्यपालांच्या भाषणात दिली आहे. शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन दिले असते तर शेतकऱ्यांनी सरकारचे अभिनंदन केले असते असेही मुंडे म्हणाले.

Intro:Body:

[6/19, 3:55 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: धनंजय मुंडे #

राज्याचा कारभार पहिला तर 'रामगढ के शोले' याची आठवण येते

दुष्कालात आम्ही सरकारचा कारभार पाहिला त्यावरून रामगोपाल वर्मा यांच्या आग या सिनेमाची आठवण येते

राज्यपालांच्या मुखात हे भाषण दिले कोणी?

या सरकारचा कारभार म्हणजे अभिभाषण लिहून देतांना राज्याचा सर्व कारभार 'ऑल इज वेल' असा दिसतो

अमीर खान यांनी चौकीदार याची संगीतलेली गोष्ट मुंडे यांनी सांगत सरकारची खिल्ली उडवली

चौकीदार रात्री सगळयांना ऑल इज वेल म्हणायचा पण तो आंधळा होता..... आदी कथा सांगितली आणि असेच भाषण या आंधळ्या सरकारने असेच केले आहे..

[6/19, 3:55 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: मंत्री अनिल बोंडे यांनी मुंडे यांच्या उपमावर बोलताना आक्षेप घेतला, त्यावर तालिका सभापती गोऱ्हे यांनी अनिल बोंडे समज दिली..

[6/19, 3:55 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: राज्यपाल महोदयांच्या बद्दल आदर असता तर त्यांच्या तोंडी खोट्या गोष्टी घातल्या नसत्या- मुंडे

[6/19, 4:01 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: मुंडे #

शहिदांच्या नावाने तुम्हाला मत मागावे लागले, राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार असताना पाकिस्तानला आम्ही अनेकदा  धूळ चारली पण त्याचे राजकारण केले नाही

पैसे, ईव्हीएम मॅनेज करून पुढे विधानसभा जिंकू असे समजत असाल तर तुम्ही मूर्खांच्या नंदनवनात राहतात-मुंडे

[6/19, 4:04 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: मुंडे

राज्यपालांच्या भाषणातून कोणतेही दिशादर्शन झाले नाही, शेतकरी, बेरोजगार यांची निराशा झाली, धनगर, मराठा, मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झालीय

[6/19, 4:13 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: मुंडे #

साडेचार वर्षात वादे पूर्ण करता आले नाहीत म्हणून आता 2022 पर्यंत  शेतकऱ्यांना दाम दुप्पट करण्याचे वादे पूर्ण करण्यासाठी मुदत दिली जातेय

शेतकरी सरकारच्या विरोधात पत्र लिहून आत्महत्या करत आहेत, दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत

सरकारची आधारभूत योजना फसली आहे, अनेक शेतकऱ्यांच्या तूर, उडीद याचे पैसे सरकराने दिले नाहीत, तरीही सरकार  ऑल इज वेल म्हणतेय

आज कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करतोय, त्याला अनुदान 1400 कोटी रुपये अनुदानाचे द्यायचे असताना केवळ 104 कोटी दिले

जलयुक्त शिवारमध्ये।मोठा भ्रष्टाचार झाला...22 हजार खेडी दुष्काळमुक्त केला असे सरकार सांगत आहे, मग ही कामे आणि त्यातून पाणी कुठे गेले?

धनगर , मुस्लिम, लिंगायत समाजाने विश्वास टाकला, परंतु त्यांचीही घोर निराशा केली...स्वतःचा खोटारडेपणा झाकण्यासाठी राज्यपालांच्या तोंडी खोटी भाषणे टाकली...

72 हजार जागा भरण्याचे जाहीर करून 8 महिने उलटले, त्यात 1 ही जागा भरली नाही, तेही राज्यपालांच्या भाषणात खोटी माहिती दिली..

शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन दिले असते तर शेतकऱ्यांनी सरकारचे अभिनंदन व्यक्त केले गेले असते

[6/19, 4:31 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: मुंडे,

भाजपात

भाई गिरकर,

सेनेत अनिल परब, आमच्या नीलम ताई गोऱ्हे

याांच्या निष्ठा कुठे कमी पडल्या ??

तानाजी सावंत यांच्याकडे काय होते, ते तुमच्याकडे नाही,

काय अस्वस्थता आहे ?

ज्या संघाच्या शिस्तीत चाललेय असे म्हणता ते  खरंच असे नाही

आमच्याकडं असलेले विरोधीपक्ष नेते तुमच्याकडे आले शुद्ध झाले, आम्ही दोघांनी मिळून ताडदेव येथील एफएसआय  घोटाळ्याचा प्रश्न मांडला होता आता हेच विखे पाटील आता त्याच विभागाचे मंत्री झाले आहेत त्यांनी यावर आपला बाणा दाखवावा

मुंबईच्या विकास आराखड्यात 1 लाख कोटींचा घोटाळा झाला त्याचे पुढे काय झाले? की त्यामुळेच हे मंत्रिपदाचे डील झाले का हे महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या

जयदत्त क्षीरसागर यांनी सेनेचे मंत्रीपद दिले पण विनायक मेटे यांना का मंत्रीपद दिले नाही?

त्यांनी शिवस्मारकमधील घोटाळा बाहेर काढल्याने त्यांना ही शिक्षा दिली काय?

6 मंत्र्यांना ज्या कारणावरून वगळले त्यात इतर 16 मंत्र्यांना  कधी काढणार?

शिक्षण विभागाचा विनोद झालाय, त्यात 'भगवान बचाय शेलार को'

भ्रष्टाचार आणि त्याचे आरोप आहेत, ज्यावर चौकशी स्वीकारली त्याचे काय झाले'?

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.