मुंबई - पंढरीच्या आषाढी पायवारीसाठी 'बायो-बबल' पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव, असे अनेक प्रस्ताव वारकरी शिष्टमंडळाने फडणवीस यांना दिले होते. त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना सांगितले होते आणि आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. वारकऱ्यांनी कोव्हिड-19च्या नियमांचे पालन करत पायवारी करता यावी, तसेच शेकडो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत खंड पडू नये, असा अतिशय व्यवहार्य प्रस्ताव वारकरी शिष्टमंडळाने मांडला होता आणि त्याची विरोधीपक्ष नेत्यांनी दखल घेतली आहे.
किमान 100 वारकऱ्यांच्या वारीला परवानगी द्यावी वारकऱ्यांची मागणी
दरम्यान, यंदाच्या आषाढी वारीसाठी किमान 100 वारकऱ्यांसोबत पायी पंढरीला जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आळंदी आणि देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी केली आहे. पुणे विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हा प्रस्ताव मांडला. आता विभागीय आयुक्त हा प्रस्ताव शासनाकडे पाठवतील. गेल्या अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदाय आषाढी वारीला परवानगी देण्याची मागणी करत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार पंढरपूरच्या पायी वारीला अंशत: मान्यता देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आषाढी वारी व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Uddhav Thackeray
आषाढी पायवारीसाठी 'बायो-बबल' पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.