ETV Bharat / state

भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत

भारतरत्नांची चौकशी करणारे असे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

Devendra fadanvis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Feb 8, 2021, 5:25 PM IST

Updated : Feb 8, 2021, 6:06 PM IST

मुंबई - भारतरत्नांची चौकशी करणारे असे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. शेतकरी आंदोलनावरून अनेक सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विट्सची चौकशी करण्याचे आदेश, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस -

'संतापजनक. कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, या शब्दात देवेंद्र फडणवीसांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Devendra fadanvis tweet
देवेंद्र फडणवीसांनी केलेले ट्विट.
Devendra fadanvis tweet
देवेंद्र फडणवीसांनी केलेले ट्विट.

हेही वाचा - सेलिब्रिटींच्या 'त्या' ट्विट्सची चौकशी होणार - गृहमंत्री अनिल देशमुख

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याससाठी आंतरराष्ट्रीय गायिका रेहनासह काही आंतराष्ट्रीय सेलिब्रिटींनी या आंदोलनाला समर्थन दर्शवून आंदोलनाचा सहानुभूतीने विचार करावा, असे ट्विट केले होते. रेहनाच्या ट्विट नंतर भारतीय सेलेब्रिटी आणि खेळाडूंनी हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न असून, बाहेरील लोकांनी यावर ढवळाढवळ करू नये, असे ट्विट केले. यात भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेते अक्षय कुमार, अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांचा समावेश आहे.

सचिन सावंत यांची तक्रार -

हे ट्विट भीतीच्या छायेत केले आहे. तसेच सेलिब्रिटी आणि खेळाडू यांनी केलेले ट्विट यात समानता दिसून येत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सेलिब्रिटींच्या ट्विटमध्ये काही शब्द साम्य दिसत आहे. तसेच सायना नेहवाल आणि अक्षय कुमार यांचे ट्विट एकसारखेच असल्याचा आरोप सावंत यांनी केला. तर सुनील शेट्टी यांनी ट्विट केल्या नंतर स्थानिक भाजप कार्यकर्त्याला टॅग केले असल्याचेही सावंत यांनी सांगितले. त्यामुळे भाजप सरकारने दबाव टाकून हे ट्विट करण्यास या सलिब्रिटींना भाग पाडलंय, असा आरोप करत याची चौकशी व्हावी, म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. तर या तक्रारीनंतर कारवाई करण्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

Last Updated : Feb 8, 2021, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.