ETV Bharat / state

सीमाभाग मुद्द्यावर विरोधकांनी सहकार्य करावे - अजित पवार - उपमुख्यमंत्री अजित पवार बातमी

सीमा भागाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. केंद्रात व कर्नाटकात भाजपची सत्ता असून विरोधी पक्षातील भाजपने सहकार्याची भावना ठेवून हा मुद्दा तडीस न्यावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ajit pawar
अजित पवार
author img

By

Published : Mar 4, 2021, 6:48 PM IST

मुंबई - सीमाभाग प्रश्नावर मुख्यमंत्री दालनात बैठक झाली. अ‌ॅड. हरेश साळवे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्रात आणि कर्नाटकात भाजप सत्तेत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सीमा भागाचा प्रश्न सोडवण्याची सरकारची भूमिका आहे. विरोधी पक्षातील भाजपने सहकार्याची भावना ठेवून हा मुद्दा तडीस न्यावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कांदळवनाचे रक्षणासाठी कठोर पाऊल

मुंबईतील कांदळवने नष्ट करणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचलले जाणार आहे. काही कांदळवने खासगी आहेत तर काही शासकीय आहेत. पण, कांदळवनामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.

पुतळ्याची उंची वाढवली

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाया बांधणीचे काम 45 टक्के पूर्ण झाले आहे. राज्याची आर्थिक स्थिती हलाखीची असली तरी पुतळ्याचा निधी कमी पडू देणार नाही, असे पवार म्हणाले.

...तर 12 सदस्य उपस्थित राहिले असते

राज्यपालांनियुक्त 12 आमदारांची नियुक्त्यांवर अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यपालांनी 12 सदस्यांचा प्रश्न सोडवला असता तर ते सदस्य सभेत उपस्थित राहिले असते आणि त्यांचे प्रश्नही त्यांना मांडता आले असते.

हेही वाचा - केंद्र सरकारने महागाई कमी करून दिलासा द्यावा - उपमुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.