मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने कहर केला असताना त्यावर लस अजून प्रतीक्षेत आहे. मात्र नागरिक आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेद औषधांना पसंती देत असून गेल्या तीन महिन्यात आयुर्वेदीक औषधांच्या खरेदीत दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जगभरात कोरोना साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंत जगभरात पाच लाखांहून अधिक लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे. भारतात 20 हजाराच्या वर कोरोना बळींची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे सरकार आपल्या परीने कोरोना संदर्भात उपाययोजना करत आहेत. मात्र नागरिक प्रामुख्याने प्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.
औषधाचे नाव औषधी स्वरूप | लॉकडाऊन आधी प्रति दिन खप | लॉकडाऊन नंतरचा प्रति दिन खप |
1. अश्वगंधा गोळी, पावडर, द्रव्य | 10-12 | 20-24 |
2. मासदर्शन काढा (बाटली) | 8-10 | 15-20 |
3. गिलोयवटी गोळी(टॅबलेट) | 12-15 | 25-30 |
4. तुलसीरस ड्रॉप्स | 6-8 | 12-15 |
भारतात हजारो वर्षापासून आयुर्वेद प्रचलित आहे. लहान मोठ्या आजारांवर घरातच काही विशिष्ठ पदार्थांचा वापर करून त्याचा औषध म्हणून वापरही केला जातो. असे आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्या एका निवृत्त कर्मचाऱ्याने माहिती दिली. यांच्या मते कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरू झाल्यापासून त्यांनी आयुर्वेदिक औषधांचे सेवन पण आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वाढवले आहे, त्यांच्या मते आयुर्वेदिक औषधांचा काही दुष्परिणाम नसल्यामुळे ही औंषधे शरीरासाठी लाभधायक असतात आणि त्यातल्या औषधी गुणांमुळे रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. मधुमेह असलेले निवृत्ते असलेले हे कर्मचारी कोरोनाचा देशात प्रादुर्भाव होण्या आधीपासून आयुर्वेदिक औषधांचे सेवन करत आहेत आणि त्याचा त्यांना लाभ ही झाला असल्याचे ते सांगतात.
सध्याच्या स्थितीत रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही उपलब्ध आयुर्वेदिक औषधांना मागणी असल्याचा दुजोरा प्रसिद्ध धूपपापेश्वर आयुर्वेदिक औषध निर्मितीचे उत्पादन व्यवस्थापक अविनाश ठाकूर यांनी दिला आहे. मात्र, याचा नेमका खप किती वाढला यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. सध्या केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडूनही रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्या संदर्भात नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत, त्याचा ही परिणाम आयुर्वेदिक औषधाच्या मागणीवर होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.