मुंबई: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांच्या बाबत केलेला आक्षपार्ह वक्तव्यातचा राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध नोंदवला जात आहे. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाही राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'नटी' असे संबोधल्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्हीही मंत्रांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जात आहे.
राज्यपालांना निवेदन दिले आता या दोन्ही नेत्यांनी केलेल्या आक्षपार्ह वक्तव्याबाबत दोन्ही पक्षाच्या महिला नेत्यांचे शिष्टमंडळ राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आज दुपारी 12 च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि आमदार विद्या चव्हाण, निर्मला सावंत आणि शिंदे गटाकडून मनीषा कांयदे या नेत्या राज्यपालांची भेट घेऊन दोन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. याबाबत राज्यपालांना निवेदन दिले. महाविकास आघाडीच्या महिल्या नेत्यांचे शिष्टमंडळांनी राज्यपालांची भेट घेऊन सुप्रिया सुळे यांच्याबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत निवेदन देण्यात आले आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला संताप व्यक्त करत आहेत.
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यायला हवा सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने महिलांचा अपमान करणारी वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता कृषिमंत्र्यांनी तर थेट सुप्रिया सुळे यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हेतू पुरस्कर शिव्या दिल्या असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. तर गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या नटी आहेत असं म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अब्दुल सत्तार यांना समज देतो असं म्हणत आहेत. मात्र अब्दुल सत्तार हे समज देण्याच्या पलीकडे गेले आहेत. आतापर्यंत अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. अब्दुल सत्तार यांच्यासह मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचीही तक्रारीचे निवेदन राज्यपालांना दिले, असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कांदे यांनी सांगितले आहे.
या मंत्र्यांचा राजीनामा 24 तासात मुख्यमंत्र्यांनी घ्यावा एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर, अब्दुल सत्तार यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचाही राजीनामा येत्या 24 तासात मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आमदार विद्या चव्हाण यांनी केल आहे. महिलांबाबत चुकीची वक्तव्य करणाऱ्या अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असेही विद्या चव्हाण यावेळी म्हणाले आहेत.