मुंबई : कर्नाटकमधील सत्तेला काँग्रेसने सुरुंग लावत 117 जागांवर आघाडी घेतली. कर्नाटक राज्यात काँग्रेस एकाच सत्ता आल्यानंतर मोठा जल्लोष साजरा केला जातो आहे महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटांनी काँग्रेसच्या विजयाचा तोंड भरून कौतुक केला. कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत : कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. २०२४ सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन,' असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मोदी शहा सरकारची लाट ओसरत चालली : कर्नाटक राज्याच्या विधानसभेच्या निकालावरून भारतीय जनता पार्टीला स्पष्टपणे नाकारल्याचे दिसून आले काँग्रेसला बहुसंख्येने सत्ता दिल्याचे कर्नाटकच्या जनतेने दिले भारतीय जनता पार्टीने केलेल्या केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर, महागाई, बेरोजगारी,अंतर्गत नाराजी आदी मुळे भाजपाचा दारुण पराभव झाला.सूक्ष्म नियोजन, स्थानिक मुद्द्यांचा वापर, विकासाचा जाहीरनामा यामुळे काँग्रेसचा विजय झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.
कर्नाटक प्रमाणे राज्यात जनता देशद्रोह्यांना जागा दाखवेल : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आदित्य ठाकरेंनी ट्विट केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही देशद्रोह्यांच्या अनैतिक आणि भ्रष्ट राजवटीला त्यांची जागा दाखवेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कर्नाटकात 40 टक्के कमिशनचे सरकार असताना महाराष्ट्राला त्याहूनही अधिक भ्रष्ट, बिल्डर-कंत्राटदार राजवटीत ढकलण्यात आले आहे, जे असंवैधानिक, अनैतिक आणि भ्रष्ट आहे - आदित्य ठाकरे
-
If one thought Karnataka had 40% sarkar, Maharashtra has been forcefully pushed under a more corrupt builder- contractor regime that is unconstitutional, immoral and corrupt.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Just like Karnataka, the people of Maharashtra will show this regime of gaddars their place, in the…
">If one thought Karnataka had 40% sarkar, Maharashtra has been forcefully pushed under a more corrupt builder- contractor regime that is unconstitutional, immoral and corrupt.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 13, 2023
Just like Karnataka, the people of Maharashtra will show this regime of gaddars their place, in the…If one thought Karnataka had 40% sarkar, Maharashtra has been forcefully pushed under a more corrupt builder- contractor regime that is unconstitutional, immoral and corrupt.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 13, 2023
Just like Karnataka, the people of Maharashtra will show this regime of gaddars their place, in the…
भ्रष्ट कारभाराविरुद्ध मतदान : कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्रातील जनता या देशद्रोही राजवटीला त्यांची जागा दाखवेल. तशी पहिली संधी मिळताच निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळेल. काँग्रेसचे कर्नाटकमधील शानदार विजयाबद्दल अभिनंदन! शांतता, प्रेम आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध निर्णायकपणे मतदान करणार असल्याचे जनतेने दाखवून दिले आहे असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
- हेही वाचा -
- Grand verdict of Karnataka Live Update : कर्नाटकात ८९ जागांचे निकाल जाहीर, काँग्रेस ५६ तर भाजपचा २६ ठिकाणी विजयी
- Karnataka election big fights : काँग्रेसचा 45 जागांवर विजय, मुख्यमंत्रीपदासाठी ठरवला फॉर्म्युला
- Shivsena criticizes BJP : चोर आणि लफंगे हीच सत्तेची गुरुकिल्ली, सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा समाचार