मुंबई Defamation Case : दैनिक 'सामना' वृत्तपत्रामध्ये 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे आपली बदनामी झाल्याचं सांगत शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी दावा केला आहे. (Shinde Group MPs Rahul Shewale) मात्र या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केला होता. (Uddhav Thackeray) परंतु, न्यायालयाने दोषमुक्ततेचा दोघांचा अर्ज फेटाळल्यामुळे दोन्ही नेत्यांवर अब्रू नुकसानीचा खटला न्यायालयामध्ये नियमितपणे (Sanjay Raut) चालू राहणार असल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे. आज 26 ऑक्टोबर रोजी माजगाव न्यायालयाने याविषयी निर्णय दिला.
ठाकरे, राऊतांचे नाव वगळण्यास नकार : राहुल शेवाळे यांच्या बाजूनं वकील चित्रा साळुंखे यांनी जोरदार मुद्दा मांडला. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार एकदा अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये आरोपींचे नाव दाखल झाले की, ते अशा रीतीने त्यातून वगळता येत नाही. त्यामुळे न्यायालयाने राहुल शेवाळे यांच्या वकिलांनी केलेला दावा मान्य करत यांची नावे वगळण्यास स्पष्टपणे नकार देत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दावा फेटाळून लावला.
'ती' जबाबदारी आमची नाही : 'सामना' मधील मजकुरामधील जबाबदारी आमच्यावर नसल्याचा दावा दोघांंनीही केला होता. या आधीच्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे आणि संपादक संजय राऊत यांनी दावा केला होता की, 'सामना' वृत्तपत्राच्या संदर्भातील प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची जबाबदारी ही कायद्याने सहसंपादक अतुल जोशी यांच्यावर आहे. त्यामुळे मानहानी संदर्भातील बदनामीचा खटला आमच्यावर जो दाखल झालाय तो चालवता येणार नाही, खटल्याचा आमच्याशी संबंधच नाही असे म्हणणे होते.
काय आहे प्रकरण - शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मानहानीकारक खटला दाखल केला आहे. त्यामध्ये कथितरित्या म्हटलेलं आहे की, शिवसेनेच्या मुखपत्रात अर्थात 'सामना'मध्ये 29 डिसेंबर 2022 च्या अंकात राहुल शेवाळेंच्या संदर्भात त्यांचा 'रिअल इस्टेट'चा व्यवसाय पाकिस्तानात असल्याचा दावा केला होता. तसंच दुबई आणि कराचीमध्ये देखील शेवाळे यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यांचे हितसंबंध आहेत, असं ते विधान होतं. त्यानंतर 3 जानेवारी 2023 रोजी राहुल शेवाळे यांनी वकिलामार्फत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना नोटीस देखील बजावली होती. आजच्या माजगाव न्यायालय निकालामुळे आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला चालणार आहे हे सिद्ध झालं आहे.
हेही वाचा:
- Satyaki Savarkar Defamation Suit: राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे सावरकर समर्थक, कुटुंबाच्या भावना दुखावल्या- सात्यकी सावरकर
- नागपुरात किरीट सोमैया यांच्या विरोधात कॉंग्रेसने दाखल केला 1 रुपये मानहानीचा दावा
- नवाब मालिकांचा हायड्रोजन बॉम्ब फुसकाच, मलिकांविरुद्ध एक रुपयाचा मानहानीचा दावा ठोकणार - मुन्ना यादव