ETV Bharat / state

मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या तावडीतून ४८ तासात वाचवले गुन्ह्यातील ३.८० कोटी - Mumbai Police

Cyber Crime News : सायबर फसवणुकीची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर सायबर फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यात सायबर गुन्हेगारांनी महिलेची एकूण 4.56 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्यापैकी ३ कोटी ८० लाख इतकी रक्कम गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आलं आहे.

Cyber Crime News
सायबर गुन्हे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 10:31 PM IST

मुंबई Cyber Crime News : मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर क्राईम विभागाला सायबर फसवणूक झाल्याची महिला तक्रारदाराकडून 1930 हेल्पलाइनवर कॉल केल्याने समजले. महिला तक्रारदाराने आपली फसवणूक झाल्याची माहिती सायबर क्राइमला १९३० या हेल्पलाइन क्रमांकवर सांगितल्या पासून 48 तासांच्या आत 3 कोटी ८० लाख रुपये गोठवण्यात सायबर क्राईम विभागाला यश आलं आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक : ही फसवणूक एका इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून करण्यात आली होती. ज्यात पीडितेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून दुप्पट पेक्षा जास्त नफा मिळवून देण्याची आमिष दाखवण्यात आली. परंतु नफा जास्त देणार सांगूनही हस्तांतरित केला जात नव्हता. यावर जेव्हा इन्स्टाग्राम वापरकर्ता आणि फायनान्सरने चौकशी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने वांद्रे येथील बीकेसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तात्काळ पीडितेच्या बँक खात्यातील पैसे पोलिसांनी गोठवले असल्याची माहिती, सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त डी स्वामी यांनी दिली आहे. सायबर गुन्हेगारांनी महिलेची एकूण 4.56 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्यापैकी ३ कोटी ८० लाख इतकी रक्कम गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आलं आहे.

1930 वर साधला संपर्क : सायबर फसवणूकीला बळी पडल्यानंतर, एका महिलेने मदतीसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधला. ज्यामुळं 3.80 कोटी रुपये वाचवण्यात आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी महिलेची एकूण 4.56 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. महिलेने सायबर फसवणुकीची तक्रार तत्काळ दाखल केल्याने, पोलिसांना पीडितेच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी अधिक वेळ मिळाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

फसवणूक करणाऱ्यांनी महिलेची फसवणूक कशी केली : मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त डी एस स्वामी यांनी सांगितलं की, त्या महिलेला इंस्टाग्रामवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी जाहिरात दिसली होती, त्यासोबत लिंक होती. लिंकने शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे वाढीव नफ्याचे आमिष दाखवण्यात आली होती. सुरुवातीला, महिलेने अंदाजे 4.56 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि नंतर ती तिच्या गुंतवलेल्या भांडवलावर नफा स्वरूपातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला समजलं की, ती सायबर फसवणुकीला बळी पडली आहे.

अनेक बँक खात्यांमध्ये फसवणूक केलेले पैसे ट्रान्सफर केले : तक्रारदाराने, 4 जानेवारी ते 6 जानेवारी या कालावधीत पैसे गुंतवले होते. 7 जानेवारीला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. घटनेची माहिती हेल्पलाइन क्रमांक 1930 वर दिल्यानंतर सायबर सेलने वेगाने तपास सुरू केला. चौकशी दरम्यान, फसवणूक केलेले पैसे वेगवेगळ्या बँकांमधील विविध खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचं पोलिसांना आढळले. महिलेच्या रक्कमेपैकी अंदाजे 70 ते 80 लाख रुपये गुन्हेगारांनी आधीच काढण्यात आले होते.

हेही वाचा -

  1. Cyber fraud with High Court Chief Justice : कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची सायबर फसवणूक; जामतारा येथून 4 गुन्हेगारांना अटक
  2. Cyber Fraud : सायबर गुन्हेगारांची फसवणूक करण्याचा 'हा' नवा प्रकार ऐकून व्हाल थक्क!
  3. Mumbai Cyber Crime : प्रलोभनाने भुलवून ओढतात सायबर क्राईमच्या विळख्यात, लॉकडाऊन नंतर नोकरी फसवणुकीच्या प्रमाणात वाढ

प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त डी. स्वामी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.