ETV Bharat / state

भाकप, जनता दल व लोकभारती पक्षांचा महाआघाडीला पाठिंबा, प्रचारात होणार सामील - Maharashtra

भाकपाचे राज्य सरचिटणीस कॉ. प्रकाश रेड्डी म्हणाले की, आम्ही घेतलेला निर्णय हा आमच्या पक्षाच्या धोरणाशी विसंगत आहे. मात्र, आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील आघाडीचे जे उमेदवार आहेत, त्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देत आहोत. भाजप हे देशात अदानी-अंबानी यांच्या इशाऱ्यांवर चालणारे सरकार आहे, हे फसिस्ट शक्तीचे सरकार असल्याने त्याविरुद्ध ही निवडणूक आहे.

भाकप, जनता दल व लोकभारती पक्षांचा महाआघाडीला पाठिंबा, प्रचारात होणार सामील
author img

By

Published : Apr 16, 2019, 11:12 AM IST

मुंबई - देशातील फॅसिस्टवादी मोदी सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी व देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी पक्षीय विचार आणि मतभेद बाजूला ठेवत भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, जनता दल (सेक्युलर), लोक भारतीसह सिटीजन फोरम फॉर डेमोक्रॉसी आदी पक्षांनी राज्यातील महाआघाडीला जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली. देशातील परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय आम्ही घेतला असून आमच्या सर्व पक्षांकडून लोकसभेत महाआघाडीचा प्रचार केला जाईल अशी भूमिका यावेळी या पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आली.

भाकप, जनता दल व लोकभारती पक्षांचा महाआघाडीला पाठिंबा, प्रचारात होणार सामील

भाकपाचे राज्य सरचिटणीस कॉ. प्रकाश रेड्डी म्हणाले की, आम्ही घेतलेला निर्णय हा आमच्या पक्षाच्या धोरणाशी विसंगत आहे. मात्र, आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील आघाडीचे जे उमेदवार आहेत, त्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देत आहोत. भाजप हे देशात अदानी-अंबानी यांच्या इशाऱ्यांवर चालणारे सरकार आहे, हे फसिस्ट शक्तीचे सरकार असल्याने त्याविरुद्ध ही निवडणूक आहे. या देशात अशी परिस्थिती कधीही आली नव्हती. गांधीजीच्या प्रतिमेवर गोळ्या घातल्या जातात, संविधान जाळले जाते आणि एकावरही कारवाई होत नाही. अनेक संस्था उध्वस्त केल्या जात आहेत, एकही संस्था शिल्लक ठेवली नाही. आता हेच लोक जवानांच्या नावाने मते मागत फिरत आहे, यामुळे आम्ही सर्वशक्ति एकत्र येऊन आम्ही समोर येऊन पाठींबा देत असून आमचे कार्यकर्ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरतील असेही यावेळी कॉ. रेड्डी यांनी सांगितले.

जनता दल (सेक्युलरचे )प्रभाकर नारकर म्हणाले की, देशाची व्यवस्था मोदींनी मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाच वर्षात निर्यातीचा दर शून्यावर आला आहे. मोदींनी मायावी वातावरण तयार केले आहे. त्याला जनता भुलली होती, आता त्यांना सत्तेतून खेचून काढण्यात आम्ही राज्यात महाआघाडीला पाठिंबा देत आहोत, आमच्या वेगवेगळ्या टीम काम करणार असल्याचे नारकर यांनी स्पष्ट केले. लोकभारतीचे डॉ. कैलास गौड यांनी सांगितले की, धर्मनिरपेक्ष चेहरा कायम टिकावा म्हणून आम्ही महाआघाडीसोबत आहोत, त्यांचा प्रचारही आम्ही करणार आहोत. सिटीजन फोरम फॉर डेमोक्रोसीचे फिरोज मिठीबोरवाला म्हणाले की, ही निवडणूक ही देशातील फसिस्ट शक्तीच्या विरोधात आहे, देशातील जनता मोदी-शहा यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी तयार झाले आहेत. त्यासाठी नियोजन करून आम्ही काम करत आहोत.

यावेळी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनीही देशातील परिस्थिती लक्षात घेऊन महाआघाडीला पाठिंबा देण्यासाठी समोर आलेल्या विविध पक्षांच्या भूमिकेचे स्वागत केले. आता एक विचारधारेची ही लढाई आहे, त्यामुळे सर्व एकत्र येत असून आणखी काही पक्ष महाआघाडीच्या बाजूने उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान काँग्रेसच्या केंद्रीय समितीचे सदस्य आशिष दुवा यांनीही विविध पक्षांच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे चरणसिंग सप्रा, मधु चव्हाण माजी आमदार युसुफ अब्राहनी आदी नेते उपस्थित होते.

Intro:भाकपा, जनता दल, लोकभारतीचा राज्यातील महाआघाडीला पाठिंबा ; प्रचारात होणार सहभागी
(यासाठी 3g live 07 वरुन फिड पाठवलेले आहे)
मुंबई, ता. 15 : देशातील फॅसिस्टवादी मोदी सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी व देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी पक्षीय विचार आणि मतभेद बाजूला ठेवत आज भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, जनता दल (सेक्युलर), लोक भारतीसह सिटीजन फोरम फॉर डेमोक्रॉसी आदी पक्षांनी आज राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली. देशातील परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय आम्ही घेतला असून आमच्या सर्व पक्षांकडून लोकसभेत महाआघाडीचा प्रचार केला जाईल अशी भूमिका यावेळी या पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आली.
भाकपाचे राज्य सरचिटणीस कॉ. प्रकाश रेड्डी म्हणाले की, आम्ही घेतलेला निर्णय हा आमच्या पक्षाच्या धोरणाशी विसंगत आहे, मात्र आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील आघाडीचे जे उमेदवार आहेत, त्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देत आहोत. भाजप हे देशात अदानी-अंबानी यांच्या इशाऱ्यांवर चालणारे सरकार आहे, हे फसिस्ट शक्तीचे सरकार असल्याने त्याविरुद्ध ही निवडणूक आहे. या देशात अशी परिस्थिती कधीही आली नव्हती. गांधीजीच्या प्रतिमेवर गोळ्या घातल्या जातात, संविधान जाळले जाते आणि एकावरही कारवाई होत नाही.अनेक संस्था उध्वस्त केल्या जात आहेत, एकही संस्था शिल्लक ठेवली नाही. आणि आता हेच लोक जवानांच्या नावाने मते मागत फिरत आहे, यामुळे आम्ही सर्वशक्ति एकत्र येऊन आम्ही समोर येऊन पाठींबा देत असून आमचे कार्यकर्ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरतील असेही यावेळी कॉ. रेड्डी यांनी सांगितले.
जनता दल (सेक्युलरचे )प्रभाकर नारकर म्हणाले की, देशाची व्यवस्था मोदींनी मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे..पाच वर्षात निर्यातीचा दर शून्यावर आला आहे. मोदींनी मायावी वातावरण तयार केले आहे. त्याला जनता भुलली होती, आता त्यांना सत्तेतून खेचून काढण्यात आम्ही राज्यात महाआघाडीला पाठिंबा देत आहोत, आमच्या वेगवेगळ्या टीम काम करणार असल्याचे नारकर यांनी स्पष्ट केले. लोकभारतीचे डॉ. कैलास गौड यांनी सांगितले की, धर्मनिरपेक्ष चेहरा कायम टिकावा म्हणून आम्ही महाआघाडीसोबत आहोत, त्यांचा प्रचारही आम्ही करणार आहोत. सिटीजन फोरम फॉर डेमोक्रोसीचे फिरोज मिठीबोरवाला म्हणाले की, ही निवडणूक ही देशातील फसिस्ट शक्तीच्या विरोधात आहे, देशातील जनता ही मोदी-शहा यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी तयार झाले आहेत. त्यासाठी नियोजन करून आम्ही काम करत आहोत.
यावेळी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनीही देशातील परिस्थिती लक्षात घेऊन महाआघाडीला पाठिंबा देण्यासाठी समोर आलेल्या विविध पक्षांच्या भूमिकेचे स्वागत केले. आता एक विचारधारेची ही लढाई आहे, त्यामुळे सर्व एकत्र येत असून आणखी काही पक्ष महाआघाडीच्या बाजूने उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान काँग्रेसच्या केंद्रीय समितीचे सदस्य आशिष दुवा यांनीही विविध पक्षांच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे चरणसिंग सप्रा, मधु चव्हाण माजी आमदार युसुफ अब्राहनी आदी नेते उपस्थित होते.

Body:भाकपा, जनता दल, लोकभारतीचा राज्यातील महाआघाडीला पाठिंबा ; प्रचारात होणार सहभागी Conclusion:भाकपा, जनता दल, लोकभारतीचा राज्यातील महाआघाडीला पाठिंबा ; प्रचारात होणार सहभागी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.