ETV Bharat / state

जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयातील मृत्यूंची टास्क फोर्समार्फत चौकशी

कोरोनाबाधित रुग्णांची गरज तसेच भविष्याची आवश्यकता लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये, यासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या रुग्णांच्या मृत्युसंदर्भात महानगरपालिकेच्या वतीने ‘मृत्यू परिक्षण समिती’ व राज्य टास्क फोर्स यांच्यावतीने देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

jogeshwari
जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयातील मृत्यूंची टास्क फोर्समार्फत चौकशी
author img

By

Published : Jun 1, 2020, 10:36 PM IST

मुंबई - जोगेश्वरी पूर्व येथील महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत आहे. अपुऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. तसेच रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. रुग्णालयात मागील आठवड्यात जे मृत्यू झाले त्याची चौकशी 'मृत्यू परिक्षण समिती’ व राज्य टास्क फोर्स यांच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयात मागील आठवडाभरात झालेले मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किंवा सदोष ऑक्सिजन पुरवठ्यामुळे झालेले नाहीत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची योग्य व पुरेपूर काळजी घेऊन त्यांना आवश्यक ते औषधोपचार देण्यात येत आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आवश्यक आहे, त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळेल, याची खात्री करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची गरज तसेच भविष्याची आवश्यकता लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये, यासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या रुग्णांच्या मृत्युसंदर्भात महानगरपालिकेच्या वतीने ‘मृत्यू परिक्षण समिती’ व राज्य टास्क फोर्स यांच्यावतीने देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

१९ मार्चपासून समर्पित कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत २२५ खाटांच्या या रुग्णालयात आतापर्यंत दाखल रुग्णांपैकी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण औषधोपचार घेऊन बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उत्तम असणाऱ्या रुग्णालयांमध्ये या ट्रॉमा केअर रुग्णालयाचा समावेश आहे. डायलिसिस आवश्यक असणाऱ्या रुग्णांसाठी येथे १० मशीन उपलब्ध असून मागील १ महिन्यांत २०० हून अधिक डायलिसिस करण्यात आले आहेत. या रुग्णालयात ११७ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागारांचादेखील समावेश आहे. आवश्यक ते सर्व औषधोपचार व सुविधा पुरवून रुग्णांची पुरेपूर काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.