ETV Bharat / state

मुंबई महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस स्वबळावर लढवणार

काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वतः 227 जागांवर लढू इच्छिते. मी पदभार स्वीकारल्यानंतर तेच बोललो होतो. आजही मी त्यावर ठाम असल्याचे मुंबई प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Mumbai Mnc Election
मुंबई महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस स्वबळावर लढवणार
author img

By

Published : Jan 6, 2021, 9:45 PM IST

मुंबई - काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वतः 227 जागांवर लढू इच्छिते. मी पदभार स्वीकारल्यानंतर तेच बोललो होतो. आजही मी त्यावर ठाम असल्याचे मुंबई प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा - मुंबईत 795 नवे कोरोनाग्रस्त, 8 रुग्णांचा मृत्यू

अनेक नेते काँग्रेस सोडून गेले आहेत. त्यांना पुन्हा परत आणणार. त्यांची घरवापसी केली जाणार असून, 100 दिवसाच्या कार्यक्रमात अनेक नेते काँग्रेसमध्ये येतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. काँग्रेसचा महापालिकेत विरोधीपक्ष नेता कोण असावा याचा निर्णय काँग्रेसच घेणार. याचा कोणताही परिणाम सरकार आणि महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, असेही जगताप यांनी सांगितले.

मुंबईकरांची फडणवीस सरकारने केली घोर फसवणूक

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबईकरांच्या ५०० चौरस फूट घरांसाठी प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला, आणि त्याची अंमलबजावणी करताना मात्र केवळ एकच जनरल टॅक्स माफ करण्यात आला. आणि यातून कोट्यवधी मुंबईकरांची फडणवीस सरकारने घोर फसवणूक केली, असा आरोप जगताप यांनी केला. महविकास आघाडी सरकारने जो सुरुवातीला जीआर निघाला तो पूर्ण लागू करावा. मुंबईकरांचा पूर्ण टॅक्स माफ करावा, अशी मागणी जगताप यांनी केली.

सर्व झोपडपट्टीधारकांना मोफत पाणी पुरवठा करा

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व झोपडपट्टीधारकांना मोफत पाणी पुरवठा करावा. महिन्याला या झोपडपट्टी धारकांचे पाणी बिल 500 कोटी इतके येते. यातून महापालिकेच्या तिजोरीवर केवळ 162 कोटींचा बोजा पडेल. पण, लाखो गरिबांना त्याचा फायदा मिळेल. तसेच, मुंबईतील पाणी माफिया कोट्यवधी रुपयांची पाणी चोरी करत असतात. त्याला आळा घालावा, अशी मागणी देखील जगताप यांनी केली.

स्काय वॉकविषयी नागरिकांना काय वाटते; सर्वेक्षण करा - जगताप

बोरिवली पूर्व ते ओंकारेश्वर मंदिर या दरम्यान स्काय वॉक तयार होत आहे. त्याला 92 कोटी खर्च लागणार आहे. मुंबईत आतापर्यंत जे स्काय वॉक तयार झाले, त्यांचा वापर किती होत आहे, त्याचा अनेक ठिकाणी गैरवापर होत आहे, त्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. यामुळे बोरिवलीच्या लोकांना यावर काय वाटते, याचे सर्वेक्षण केले जावे, अशा प्रकारे लोकांचा पैसा वाया घातला जाऊ नये, अशी मागणी जगताप यांनी केली.

लवकरच शंभर दिवसाचा कार्यक्रम

मुंबईत काँग्रेसला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी आम्ही 100 दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले असून या माध्यमातून पुढील शंभर दिवसात 227 वॉर्डमध्ये पोहोचणार. प्रत्येक वॉर्डमध्ये काँग्रेस आहे. हे आम्ही दाखवणार आहोत, असेही जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा - घरांच्या किंमती कमी होणार; प्रीमयममध्ये सवलतीच्या निर्णयाचा बिल्डरांसह ग्राहकांनाही फायदा!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.