मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आठ सहकाऱ्यांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. दोन्ही गटांच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध कारवाई करण्याचे पत्रे विधानसभा अध्यक्षांना पाठवले. त्याआधारे विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांच्या आमदारांना पत्रे पाठवली असतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. आपले राज्य सशक्त लोकशाही राज्य असायला हवे होते, पण निकाल येण्यास वेळ लागेल. त्यावेळी प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल असे देखील पटोले म्हणाले.
शरद पवार यांच्यापूर्वीच मी म्हणालो होतो : आम्हाला सोडून गेलेले राष्ट्रवादीचे काही नेते भाजप मुख्यालयाची भाषा करत आहेत. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट स्क्रिप्टेड आहे. शिवसेना फुटली तेव्हाही त्यांची भाषा आणि आता राष्ट्रवादीपासून वेगळे झालेल्यांची भाषा सारखीच आहे. त्यामुळे दोघांच्याही स्क्रिप्ट भाजपच्या मुख्यालयातून येत असल्याचे स्पष्ट झाल्याचे पटोले म्हणाले.
कॉंग्रेस फुटीवर : दिल्लीमधील 14 जुलैला बैठकीसाठी कोणाकोणाला बोलावले याबाबतची माहिती आमच्याकडे आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी शालेय मुलांचा वापर केला. यावरून नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरले आहे. जनता त्यांच्या पाठीशी नाही. फुटलेले आमदार आता आपापल्या मतदारसंघात ताकद दाखवत आहेत. कागल येथील अनिल पाटीलही शाळेतील मुलांचा स्वागत म्हणून चुकीचा वापर करतात. लोकांचा याला विरोध आहे. महाराष्ट्रातील लोकशाही आणि विचारांची हत्या करण्यासाठी भाजप आपल्या शक्तीचा वापर करत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. गद्दारांना गद्दारीचे डोहाळे लागले आहेत. काँग्रेस मजबूत आहे, काँग्रेसमध्ये गद्दार नाही यावर आम्ही अजूनही ठाम आहोत, असे नाना पटोले म्हणाले.
शरद पवार यांचे सुप्रिया सुळे प्रेम : आधी शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांवर जास्त प्रेम केल्याचा आरोप होत होता. आता शरद पवारांनी लेकीवर प्रेम केल्याचा आरोप होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या भेटीशी आमचा काहीही संबंध नाही. कोणालाही भेटू द्या. शेतकऱ्याचा कापूस अजूनही घरीच आहे. शेतकरी त्रस्त असताना येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरणार आहोत. अधिवेशनानंतर काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचा दौरा करणार असल्याचे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.
हेही वाचा - NCP Political Crisis : 25 हजार कोटींचा घोटाळा लपवण्यासाठी अजित पवार भाजपच्या दावनीला - शालिनीताई पाटील