ETV Bharat / state

मी भाजपत जाणार हे सांगणे म्हणजे वेडेपणा; विश्वजित कदमांचे स्पष्टीकरण

मी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आहे. काँग्रेसचा विधिमंडळाचा आमदार आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवणार आहे. माझ्याविषयी बाहेर जी काही चर्चा सुरू आहे त्याला मी जास्त महत्तव देत नसल्याचे विश्वजित कदम म्हणाले

विश्वजित कदम
author img

By

Published : May 29, 2019, 2:48 PM IST

Updated : May 29, 2019, 6:13 PM IST

पुणे - काँग्रेस आमदार विश्वजित कदम भाजपच्या वाटेवर असल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, विश्वजित कदम यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार नसल्याचे विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जनतेचा आशिर्वाद घेऊन काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. दोन दिवसांपूर्वी यामध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या नावाची भर पडली. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर मी भाजपत जाणार हे सांगणे म्हणजे वेडेपणा असल्याचे त्यांनी सांगितले.

सुजय विखे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार आणि कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यात काँग्रेस आमदार विश्वजित कदम हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

आमचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी विश्वजित कदम यांच्यासोबत केलेली बातचीत

काय म्हणाले विश्वजित कदम -

मी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आहे. काँग्रेसचा विधिमंडळाचा आमदार आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवणार आहे. माझ्याविषयी बाहेर जी काही चर्चा सुरू आहे त्याला मी जास्त महत्तव देत नाही. त्यामुळे मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, त्यावर कुणीही शंका घेऊ नये. मी पश्चिम महाराष्ट्रात काम करतो. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना माझ्याविषयी काही वाटलं असेल, पण असं असलं तरीही मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आणि चंद्रकांत दादांनी मला भाजपत येण्याची ऑफर दिली होती. तेव्हाच मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला होता. मी ग्रामीण भागातील आमदार आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न घेऊन मी सत्ताधाऱ्यांशी बोलत असतोच. त्यामुळे एखाद्या भाजप नेत्यांशी बोललो, भेटलो म्हणजे भाजपत प्रवेश करणार असे होत नाही. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून ज्या काही बातम्या येत आहेत त्यामध्ये अजिबात तथ्य नसल्याचे विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Av

Feed send - file name - MH_SNG_VISHWAJIT_KADAM_ON_BJP_VIS_1_7203751 -

स्लग - मी भाजपात जाणर हे सांगणे म्हणजे वेडेपण - काँग्रेस आमदार विश्वजित कदम .

अँकर - काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि जिल्ह्यातील काही नेते भाजपाचा वाटेवर असल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे.दरम्यान विश्वजित कदम यांनी या वृत्ताचे खंडन करत आपण कदापि भाजपात जाणार नाही, या आणि मी भाजपात जाणार हे सांगणे म्हणजे वेडेपण असं मत व्यक्त करत ,आपण काँग्रेस मध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे तूर्त या प्रवेश वृतांना पूर्ण विराम मिळाला आहे. Body:काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर राज्यातील काँग्रेस मध्ये खळबळ उडाली आहे.त्यांच्या बरोबर आणखी काही काँग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.तर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार माजी मंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त पसरला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे . त्यांच्या जिल्ह्यातील काही काँग्रेसमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसला खिंडार पडणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या सर्व पार्श्वभूमीवर भाजप प्रवेश केला आहे.मी भाजपात जातोय,हे सांगणे म्हणजे वेडेपणा ठरेल अश्या शब्दात ,विश्वजित कदम यांना आपण भाजपात जाणार नाही, काँग्रेस मध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.यामुळे विश्वजीत कदम यांच्या आणि भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. मात्र राज्यातील आणि जिल्ह्यातील राजकीय स्थिती पाहता भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात काय घडेल हे सांगणे कठीण आहे.Conclusion:
Last Updated : May 29, 2019, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.