ETV Bharat / state

Congress Aggressive Against BJP : भाजपानं लावलं राहुल गांधी यांचं रावणाच्या वेशातील बॅनर; कॉंग्रेस आक्रमक - डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान

Congress Aggressive Against BJP : भाजपच्या सोशल मीडियावर कॉंग्रस नेते राहूल गांधी यांना रावणाच्या वेशातील एक पोस्टर व्हायरल करण्यात आल्यानं सध्या कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झालीय.

Congress Aggressive Against BJP
Congress Aggressive Against BJP
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 7:39 AM IST

मुंबई Congress Aggressive Against BJP : सध्या देशातील प्रत्येक राजकीय पक्ष सामान्य जनतेपर्यंत आपले विचार, ध्येय-धोरण आणि विधेयक काम पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. भाजपाच्या सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रावणाच्या वेषात दाखवण्यात आल्यानं काँग्रेस सध्या चांगलीच आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. कॉंग्रेसनं मुंबईत भाजपा विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय.

भाजपची रावण प्रवृत्ती : मुंबईत चेंबूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आलंय. भाजपा दोन समाजात तेढ निर्माण करत जाती जातींमध्ये द्वेष पसरुन सत्तेच्या बळावर देश तोडायचं काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. तेच दुसऱ्या बाजूला संविधान, लोकशाही आणि एकता आबाधित रहावी, यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडोच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून भाजपची रावण प्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यावर उतरल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. राहुल गांधी यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर सळो की पळो करुन सोडू असा इशारा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी भाजपाला दिलाय.

भाजपाच्या आयटी सेलवर कारवाई करा : दुसरीकडं मुंबई काँग्रेसच्या वतीनंही मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. बांद्रातील एका मुलानं मॅसेज फॉरवर्ड केला तर केस दाखल करण्यात आली. मात्र, आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. देशामध्ये रावणराज कोणाचं सुरू आहे, हे सांगायची गरज नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींवर टीका करणारे लोक बाहेर आहेत, देशात बेरोजगारी, महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महात्मा गांधींची सन्मान रॅली काढणाऱ्या लोकांना अडवलं जात आहे. मणिपूर मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाही. मात्र, समाजात द्वेष पसरवायचं काम सुरू आहे. किती यंत्रणा आमच्या मागं लावा, मात्र आम्ही घाबरणार नाही. आमचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत पोस्ट करणाऱ्या भाजपाची आयटी सेलवर कारवाई करुन आयटी सेल बंद करावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. Prithviraj Chavan On Loksabha Election: पंतप्रधान लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील, कारण... पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य
  2. Congress Six Guarantees Telangana : विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणातील जनतेसाठी सोनिया गांधींनी सांगितली 'सहा सूत्री' योजना
  3. MP Assembly Election : ...म्हणून मध्य प्रदेशात कॉंग्रेस पुनरागमन करेल; सी पी मित्तल यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.