मुंबई : शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच पक्षस्तरीय बैठक आहे. शिंदे गटासोबतच राहू, असे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणाले. नवीन कार्यकारिणीच्या नियुक्तीसारखे काही निर्णय अपेक्षित आहेत, असे ते म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर कोणत्याही पक्षाच्या मालमत्तेवर कोणताही दावा केला जाणार नाही, असे शिंदे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
संपत्तीच्या मोहात चुकीचे पाऊल : आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीचे वारसदार आहोत. आम्हाला कोणतेच प्रलोभन नाही. मला शिवसेनेच्या संपत्तीचा किंवा निधीचा लोभ नाही. मी अशी व्यक्ती आहे जिने नेहमी इतरांना काही ना काही दिले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले होते. संपत्ती आणि संपत्तीच्या मोहात पडलेल्यांनी २०१९ मध्ये चुकीचे पाऊल उचलले, असे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भाजपासोबतची युती तोडल्याचा स्पष्ट संदर्भ देत ते म्हणाले होते.
अडीच वर्षाचा सत्ताकाळ : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी, शिवसेनेला बाजूला करत राष्ट्रवादी काँग्रेसला हाताशी घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती. हा वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली. ते राज्यात सत्तेवर आले होते. ठाकरे यांचा बदला घेण्यासाठी भाजपने अनेक रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. अडीच वर्षाचा सत्ताकाळ गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार केले आहे.
उद्धव ठाकरेंना आव्हान : शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेना आमची असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना आव्हान दिले होते. आमचे सरकार आल्यानंतर बंद पडलेले अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. आम्ही सातत्याने काम करत आहोत ते जनतेला काम दिसेल. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी निवडणुक आयोगावरही भाष्य केले आहे. आम्ही लाखो प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत, असे म्हणत असले तरी त्यातील अनेक प्रतिज्ञापत्रे बोगस आहेत. असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून आता शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्यांकडून शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह घेत एकनाथ शिंदे यांना दिले.