ETV Bharat / state

राहणीमान निर्देशांक सर्वेक्षणाकडे मुंबईकरांची पाठ, सर्वेक्षणात सहभागी होण्याचे महापौरांचे आवाहन

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने 'इज ऑफ लिविंग इंडेक्स' अर्थात 'राहणीमान निर्देशांक सर्वेक्षण 2019 अंतर्गत राहणीमानाकरिता देशातील सर्वोत्तम शहरांसाठी सर्वेक्षण सुरू आहे. यात देशभरातील अनेक मोठ्या शहरांनी भाग घेतला आहे.

Mumbai
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Feb 25, 2020, 9:52 PM IST

मुंबई - स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत मुंबई महापालिका वेळोवेळी मागे पडली आहे. त्यातच आता देशभरातील राहणीमान निर्देशांकाबाबत सर्व्हे केला जात आहे. त्यासाठी पालिकेने ३ वेळा जाहिरात देऊन जनजागृती केली. ठिकठिकाणी जाहिराती केल्या, त्यानंतरही नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व्हेक्षणाच्या शेवटच्या दिवसात मुंबईच्या महापौरांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुंबई शहर हे राहण्यास सर्वोत्तम शहर असल्याच्या बाजूने मुंबईकरांनी मतदान करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

किशोरी पेडणेकर, महापौर

गेल्या वर्षी झालेल्या सर्वेक्षणात देशपातळीवर पुणे पहिल्या स्थानी, नवी मुंबई दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या स्थानी होते. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने 'इज ऑफ लिविंग इंडेक्स' अर्थात 'राहणीमान निर्देशांक सर्वेक्षण 2019 अंतर्गत राहणीमानाकरिता देशातील सर्वोत्तम शहरांसाठी सर्वेक्षण सुरू आहे. यात देशभरातील अनेक मोठ्या शहरांनी भाग घेतला आहे.

मुंबई महानगरपालिका या सर्वेक्षणासाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. मुंबईकरांना यात सहभागी होता येणार असून 21 प्रश्नांची उत्तरे देऊन मुंबई शहर हे देशातील सर्वोत्तम शहर आहे, हे सिद्ध करता येणार आहे. सर्वेक्षणात मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाशी निगडित विविध प्रश्नाचा समावेश आहे. यात चांगले शिक्षण, आरोग्य सेवा, घरे परवडते का? शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आपत्कालीन सेवा कशा आहेत? महिलांसाठी शहर सुरक्षित आहे का? शहरातील मोकळ्या जागा, हवेची गुणवत्ता, करमणुकीच्या ठिकाणांबद्दल मुंबईकर खुश आहेत का? रोजगाराची संधी तसेच इतर आर्थिक सेवांबद्दल समाधानी आहात का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे देऊन मुंबईकरांना आपली मुंबई हीच देशात कशी सर्वोत्तम आहे, हे दाखवून देण्याची संधी मिळणार आहे.

१४ हजार मुंबईकरांकडून मतदान -

मुंबईला सर्वोत्तम शहरांमध्ये स्थान मिळावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसात विविध भाषांच्या 13 वर्तमानपत्रातून 3 वेळा जाहिरात देऊन याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. शहरात साडेचार हजार होर्डिंग तसेच बेस्टच्या बसवरही जाहिरातीच्या माध्यमातून याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत 14 हजार मुंबईकरांनी आपली मते नोंदवली असली तरी पुढील 5 दिवसात यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी आशा महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. मुंबईकरांना http://eol2019.org/citizenfeedback यावरही आपली मते नोंदवता येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.