ETV Bharat / state

पालिकेच्या वाहनतळांना नागरिकांचा प्रतिसाद नाही, 'नो पार्किंग'वर कडक कारवाईचे पालिका आयुक्तांचे आदेश

वाहतूक सुलभीकरणाबाबत एक विशेष बैठक गुरूवारी पालिका मुख्यालयात संपन्न झाली यावेळी आयुक्तांनी असे आदेश दिले. तसेच खासगी बस गाड्या बेस्टच्या डेपोमध्ये पार्क करण्याचा तसेच शाळेच्या बस गाडयांना पार्किंग शुल्कात कपात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

प्रविणसिंह परदेशी, पालिका आयुक्त
author img

By

Published : Sep 5, 2019, 8:58 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेने घाईगडबडीत पार्किंगसाठी धोरण तयार केले. त्यासाठी अपुरी वाहनतळ सुरु करण्यात आली. मात्र, या वाहनतळांना नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा वाहनतळांच्या परिसरात अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर सतत कारवाई करावी, असे सक्त आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

वाहनांवर कारवाई करताना वाहतूक पोलीस
वाहनांवर कारवाई करताना वाहतूक पोलीस

हेही वाचा - येत्या 6 महिन्यात महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होईल, पर्यावरण मंत्र्यांना विश्वास

शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगवर लगाम लावावा, यासाठी पालिकेने पार्किंग पॉलिसी बनवली. पालिकेने आपली 26 वाहनतळे पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनतळाच्या 500 मीटर परिसरात वाहन पार्क केल्यास पालिकेकडून 5 हजार ते 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो. या पार्किंग पॉलिसीला मुंबईकरांनी विरोध केला आहे. तसेच पालिकेने नुकतेच मुंबईमधील 5 रस्ते नो पार्किंग केले आहेत. या पार्श्वभुमीवर महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुलभीकरणाबाबत एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

'नो पार्किंग'वर कडक कारवाई
'नो पार्किंग'वर कडक कारवाई

या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, वाहतूक पोलीस खात्याचे सहआयुक्त मधुकर पांडे, महपालिकेच्या मुंबई वाहनतळ प्राधिकरणाचे विशेष कार्य अधिकारी रमानाथ झा व तज्ज्ञ सदस्य शिशिर जोशी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, महापालिका, वाहतूक पोलीस, बेस्ट उपक्रम यांचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - राज्यातील वाहतूक दंड वसूली 'जैसे थे'

यावेळी पालिकेच्या 26 वाहनतळांपैकी 14 वाहनतळांचा 50 टक्क्यांपेक्षा कमी वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सदर वाहनतळांच्या 500 मीटरच्या परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर अधिक सातत्यपूर्ण व प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच दक्षिण मुंबई, विक्रोळी व बोरिवली या भागात रस्त्यांलगत होणाऱ्या अनधिकृत पार्किंगवरही अधिक कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले.

अनधिकृत पार्किंगवर अधिक कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक त्या मनुष्यबळाची तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करण्याचे अधिकार विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना (वॉर्ड ऑफीसर) देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वाहतनळ सुविधांसोबतच अनधिकृत पार्किंगवरील कारवाईबाबत जनजागृती करावी, 'माहिती, शिक्षण व संवाद' विषयक कार्यक्रम राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

बस डेपोमध्ये पार्किंग -

पालिका क्षेत्रात सुमारे 3 हजार 500 खासगी बस गाड्या आहेत. यातील बहुतेक बस गाड्या मुंबईतील रस्त्यांवर 'पार्क' केल्या जातात. मोठ्या प्रमाणात खासगी बस गाड्या रस्त्यांलगत उभ्या राहिल्यामुळे वाहतूकीला अडथळा होतो. त्याचवेळी या बस गाड्या महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या वाहनतळांवर किंवा बेस्ट बस डेपोंमध्ये 'पार्क' केल्यास वाहतूक सुरळीत व वेगवान होण्यासाठी त्याची मोठी मदत होऊ शकते, असे आयुक्त म्हणाले.

शालेय बसला सवलत -

बेस्ट बस डेपोंमध्ये शालेय बसेस पार्क करण्यास असलेल्या शुल्कात कपात करण्याची विनंती शालेय बस संघटनेमार्फत करण्यात आली होती. या अनुषंगाने संपन्न झालेल्या समन्वय बैठकीत सविस्तर चर्चा होऊन शालेय बसेससाठी पार्किंग दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित दरपत्रक लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

Intro:मुंबई -  मुंबई महानगरपालिकेने घाईगडबडीत पार्किंगसाठी धोरण तयार केले. त्यासाठी अपुरी वाहनतळ सुरु करण्यात आली. मात्र या वाहनतळांना नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे अशा वाहनतळांच्या परिसरात अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर सतत कारवाई करावी असे सक्त आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. वाहतूक सुलभीकरणाबाबत एक विशेष बैठक आज पालिका मुख्यालयात संपन्न झाली यावेळी आयुक्तांनी असे आदेश दिले आहते. तसेच खासगी बस गाड्या बेस्टच्या डेपोमध्ये पार्क करण्याचा तसेच शाळेच्या बस गाडयांना पार्किंग शुल्कात कपात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.Body:शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, रस्त्यावर बेकायदेशीर पार्किगवर लगाम लावावा यासाठी पालिकेने पार्किंग पॉलिसी बनवली. पालिकेने आपली २६ वाहनतळे पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनतळाच्या ५०० मीटर परिसरात वाहन पार्क केल्यास पालिकेकडून ५ हजार ते १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो. या पार्किंग पॉलिसीला मुंबईकरांनी विरोध केला आहे. तसेच पालिकेने नुकतेच मुंबईमधील ५ रस्ते नो पार्किग केले आहेत. यापार्श्वभुमीवर महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुलभीकरणाबाबत एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, वाहतूक पोलीस खात्याचे सहआयुक्त मधुकर पांडे, महपालिकेच्या मुंबई वाहनतळ प्राधिकरणाचे विशेष कार्य अधिकारी रमानाथ झा व तज्ज्ञ सदस्य शिशिर जोशी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, महापालिका, वाहतूक पोलीस, बेस्ट उपक्रम यांचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालिकेच्या २६ वाहनतळांपैकी १४ वाहनतळांचा ५० टक्क्यांपेक्षा कमी वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सदर वाहनतळांच्या ५०० मीटरच्या परिसरात आढळून येणा-या अनधिकृत पार्किंगवर अधिक सातत्यपूर्ण व प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच दक्षिण मुंबई, विक्रोळी व बोरिवली या भागात रस्त्यांलगत होणा-या अनधिकृत पार्किंगवर अधिक कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले. अनधिकृत पार्किंगवर अधिक कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक त्या मनुष्यबळाची तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करण्याचे अधिकार विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना (वॉर्ड ऑफीसर) देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वाहतनळ सुविधांसोबतच अनधिकृत पार्किंगवरील कारवाईबाबत जनजागृती करावी, 'माहिती, शिक्षण व संवाद' विषयक कार्यक्रम राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.  
  
बस डेपोमध्ये पार्किंग -    
पालिका क्षेत्रात सुमारे ३ हजार ५०० खाजगी बस गाड्या आहेत. यातील बहुतेक बस गाड्या मुंबईतील रस्त्यांवर 'पार्क' केल्या जातात. मोठ्या प्रमाणात खाजगी बस गाड्या रस्त्यांलगत उभ्या राहिल्यामुळे वाहतूकीला अडथळा होतो. त्याचवेळी या बस गाड्या महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या वाहनतळांवर किंवा बेस्ट बस डेपोंमध्ये 'पार्क' केल्यास वाहतूक सुरळीत व वेगवान होण्यासाठी त्याची मोठी मदत होऊ शकते असे आयुक्त म्हणाले.

शालेय बसला सवलत - 
बेस्ट बस डेपोंमध्ये शालेय बसेस पार्क करण्यास असलेल्या शुल्कात कपात करण्याची विनंती शालेय बस संघटनेमार्फत करण्यात आली होती. या अनुषंगाने आज संपन्न झालेल्या समन्वय बैठकीत सविस्तर चर्चा होऊन शालेय बसेससाठी पार्किंग दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित दरपत्रक लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. 
बातमीसाठी वाहनावरील कारवाई आणि पालिका मुख्यालयाचा फोटो Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.