ETV Bharat / state

मराठा आरक्षण, पूर, गोल्डन बॉय, राज्यपाल दौरा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार - उद्धव ठाकरे लेटेस्ट न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आज (8 ऑगस्ट) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

mumbai
mumbai
author img

By

Published : Aug 8, 2021, 4:08 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आज (8 ऑगस्ट) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री 8 वाजता सोशल मीडियाद्वारे ठाकरे जनतेला संबोधीत करणार आहेत.

लसवंतांची, व्यापाऱ्यांची मागणी

राज्य सरकारकडून जाहीर झालेल्या नवीन नियमावलीनुसार 11 जिल्ह्यांमध्ये अद्यापही निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. तर मुंबई आणि उपनगरात निर्बंधामध्ये शिथिलता आली असली तरी लोकल प्रवासाची मुभा मिळालेली नाही. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, तसेच हॉटेल व्यवसायिक आणि व्यापारी संघटनेकडून वेळ वाढवून देण्यात यावी यासंबंधीची मागणी होत आहे.

नीरजने इतिहास लिहिला

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने इतिहास रचला आहे. कारण नीरजने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. उद्धव ठाकरेंनीही नीरजचे अभिनंदन केले आहे.

राज्यपालांच्या दौऱ्याला विरोध

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून विरोध होत आहे. तर विरोधक राज्यपालांचे समर्थन करत आहेत.

संजय राऊत-मुख्यमंत्र्यांची भेट

शिवसेना (Shivsena Leader) नेते खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात राजकीय चर्चा झाली आहे. संजय राऊतांनी दिल्लीत होत असलेल्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त अन्य महत्वाच्या राजकीय विषयांवरही संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे.

पूर परिस्थितीची पाहणी

राज्यातील काही जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. यामध्ये कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातील जिल्ह्यांना पुराचा प्रभाव जास्त असल्याने नागरिकांचे मोठे नुकसानही झाले आहे. राज्य सरकारकडून 11हजार 500 कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांसाठी घोषित करण्यात आली आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पाहणी केली. या पाहणीदरम्यान मुख्यमंत्र्यांना आलेला अनुभव, तसेच राज्यात भविष्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास राज्य सरकारकडून घेण्यात येणार्‍या दक्षता, यासंबंधी मुख्यमंत्री या संवादादरम्यान माहिती देण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण मुद्द्याबाबत बोलण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागास प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार केंद्रा सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. मात्र राज्याला केवळ अधिकार देऊन चालणार नाही. तर, 50 टक्के आरक्षण मर्यादेत शिथिलता आणल्याशिवाय राज्य सरकार आरक्षण देऊ शकणार नाही. अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली आहे. त्यामुळे एकूणच आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका काय? याबाबत देखील मुख्यमंत्री या संवादादरम्यान जनतेला माहिती देऊ शकतात.

मराठा आरक्षण संदर्भात घटनात्मक माहिती अशोक चव्हाण सगळ्यांना देणार असल्याची माहिती राऊतांनी यावेळी दिली. संसदेत मराठा आरक्षण घटनात्मक चर्चा मागणार असल्याचंही संजय राऊत म्हणालेत.

भाजप-मनसे युतीची चर्चा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यानंतर भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. तर मनसेच्या बाळा नांदगावकर यांनीही युती झाल्यास आनंदच असे म्हटले आहे. त्यामुळे मनसे-भाजपची युती शिवसेनेला भारी ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे हे सर्व विषय पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री काय बोलणार? कोरोना नियमातून कोणाला दिलासा मिळणार? या सर्व गोष्टीकडे लक्ष लागले आहे.

उद्या (9 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री लोकल सेवेबाबतही दिलासा देतील, अशी शक्यता आहे. तसेच व्यापाऱ्यांनी वाढवून मागितलेली वेळ मुख्यमंत्री मान्य करतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - चर्चा न करता सरकार विधेयक मंजूर करतंय - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.