ETV Bharat / state

अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय मार्फत चौकशी करा; चंद्रकांत पाटील यांचे अमित शहांना पत्र - chandrakant patil demand cbi investigation

चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातील अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. सचिन वाझे याला २००४ मध्ये निलंबित करण्यात आले होते. मात्र, २०२०मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

chandrakant patil wrote letter to union home minister amit shah
चंद्रकांत पाटील यांचे अमित शहांना पत्र
author img

By

Published : Jun 30, 2021, 6:30 PM IST

Updated : Jun 30, 2021, 6:39 PM IST

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोमार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे.

१०० कोटी वसूलीचा आरोप -

चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातील अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. सचिन वाझे याला २००४ मध्ये निलंबित करण्यात आले होते. मात्र, २०२०मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतले, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून तसेच उत्पादकांकडून १०० कोटी वसूल करण्यास सांगितले, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - भाजपने कुणाकुणाची जात काढली संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, आम्हाला शहाणपण शिकवू नये - राजू शेट्टी

दोघांची सीबीआय चौकशी करावी -

त्याचबरोबर, परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचे वाझे याने चौकशीत उघड केले आहे, असेही या पत्रात लिहिलेले आहे. सचिन वाझेने दिलेल्या कबुली जबाबात त्याने अजित पवार आणि अनिल परब यांनी आपल्याला वसुली करण्यास सांगितले, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या दोघांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा - विधानसभा अध्यक्ष येत्या अधिवेशनात निवडला जाणार, तर अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार - बाळासाहेब थोरात

Last Updated : Jun 30, 2021, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.