ETV Bharat / state

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला लाखोंचा जनसागर - Mahaparinirvana Program

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या काना-कोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे.

चैत्यभूमीवर लोटला लाखोंचा जनसागर
चैत्यभूमीवर लोटला लाखोंचा जनसागर
author img

By

Published : Dec 6, 2019, 10:28 AM IST

मुंबई - डोक्यावर निळी टोपी, हातात झेंडा, काखेला पिशवी अडकवून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या काना-कोपऱ्यातून हा जनसमुदाय येथे आला आहे.

चैत्यभूमीवर लोटला लाखोंचा जनसागर

बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अबालवृद्धांनी रांगा लावल्या आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. मुंबई महानगरपालिकेकडून उत्तमरित्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात लावलेल्या नेत्यांच्या बॅनरमुळे अनेक अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - बाबासाहेबांचे मुंबईमधील घर राष्ट्रीय स्मारक करणार - मुख्यमंत्री

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमानिमित्त दादर रेल्वे स्थानकापासून शिवाजीपार्क-चैत्यभूमीपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चैत्यभूमी आणि शिवाजीपार्क परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील साहित्यांनी आणि छायाचित्रांनी स्टॉल सजले आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून येथे मुक्कामाला असलेल्या नागरिकांसाठी विविध सामाजिक संस्था, संघटना, बँका, लोकप्रतिनिधींनी अल्पोहार आणि जेवणाची व्यवस्था केली आली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याठिकाणी पोलीस कर्मचारी आणि समता सैनिक दल तैनात करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केला आहे. त्यामुळे रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला आहे.

Intro:मुंबई  -- डोक्यावर निऴी टोपी, हातात झेंडा, काखेला सामानाची बॅग अडकवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लाखोंच्या संख्येने अनुयायी प्रज्ञासूर्याला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर  आले आहेत. देशाच्या कानाकोप-यातून तीन दिवस आधीपासूनच लाखोंच्या संख्येने आलेल्या कष्टक-यांसह खेड्यापाड्यातून आलेल्या छोट्या तान्हुल्यापासून ते वयोवृध्दांपर्यंत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्य़भूमीवर रांगा लागल्या आहेत.Body:बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी छोट्या लेकरांसह ८०  वर्षाच्या वृध्दांपर्यंत सा-यांनीच अभिवादनासाठी रांगा लावल्या आहेत. शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्य़ा होणा-य़ा सभांचे बॅनर्स पाहून अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्य़ात आली. मुंबई महापालिकेकडून उत्तमरित्या सोयी -सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.  
महाराष्ट्राच्या खेड़्या-पाड्यातून तसेच आंध्रा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी भागातून छोट्या तान्हुल्यापासून ते वयोवृध्दांचीही पावले दरवर्षी प्रमाणे चैत्य़भूमीच्या वाटेवर वळली आहेत. काही २० ते २५  वर्षापासून नित्यनेमाने येणारे अनुयायीही आहेत. दादर रेल्वेस्टेशन ते शिवाजीपार्क- चैत्यभूमीपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या सुविधाही पुरेसा पुरवण्यात आल्य़ाने अनेकांनी समाधान व्यक्त केले. चैत्य़भूमी व शिवाजीपार्क परिसरात डॅा. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौत्तम बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूमहाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील साहित्यांनी   स्टॉल सजले आहेत. आंबेडकर, गौत्तम बुध्द यांच्या प्रतीकृती, छायाचित्रांचे स्टॅाल्सही लावण्यात आले आहेत. मागील दोन - तीन दिवसांपासून येथे मुक्कामास असलेल्यांना विविध सामाजिक संस्था, संघटना, बँका, लोकप्रतिनिधींनी अल्पोहार व जेवणाची व्यवस्था केली आली आहे. अभिवादनासाठी जवळपास पाच ते सहा तास रांगेने उभ्या असणा-या अनुयायांना पिण्याच्य़ा पाण्याची सोय करण्यात आली आहे. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याठिकाणी पोलिस कर्मचारी आणि समता सैनिक दल तैनात करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनानेही दादर रेल्वे स्टेशन ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केला आहे.  त्यामुळे रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला होता. बाबासाहेबांच्या विचारांच्या क्रांतीच्या गीतांनी अवघा चैत्यभूमी ते शिवाजीपार्कचा परिसर दणाणून गेला आहे. दादर रेल्वेस्थानक ते चैत्यभूमी, शिवाजीपार्कपर्यंत अभिवादनाचे फलक लागले आहेत. ग्रामीण भागातून आलेले कष्टकरी ७ डिसेंबरपर्यंत राहण्याच्या तयारीने आले आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.