अकोला - पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. चाकरमान्यांच्या घरी परतण्याच्या वेळेस मध्यरेल्वेच्या गाड्या १५ ते २० मिनिटाने उशिराने धावत आहेत.
सायंकाळी सहाच्या दरम्यान कल्याण ते मुंबईच्या दिशेने जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. या मार्गावरील मुंब्रा पारसिक आणि विटावा दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे रेल्वे गाड्या उशिराने धावत होत्या. रेल्वेला गेलेला तडा दुरुस्त करून देखील रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. असुविधेमुळे हाल होत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.