मुंबई - लाईफलाईन असलेली लोकल सेवा पावसामुळे मंद गतीने धावत आहे. मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसाने या लोकल सेवेचे तीन तेरा वाजवले आहेत. आज पहाटेपासूनच लोकल सेवा बंद असल्याच्या घोषणा विविध रेल्वे स्थानकावर केल्या जात आहेत. तर, मध्य रेल्वेची सेवा पुढील सुचना येईपर्यंत खालील मार्गावरुन धावतील.
- सीएसएमटी - बांद्रा - हार्बर रेल्वे मार्ग
- वाशी पनवेल - हार्बर रेल्वे मार्ग
- ठाणे-वाशी-पनवेल - हार्बर रेल्वे मार्ग
- ४rth कॉरिडॉर ते खारकोपर, ठाणे- कासरा/कर्जत/खापोली - मुख्य रेल्वे मार्गावरून धावणार आहेत.
अनेक भागांत रेल्वे रुळांजवळ पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे.