मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे पुढील विशेष गाड्यांची मुदत वाढवणार (Central Railway extend deadline) आहे. डिसेंबरपर्यंत धावणाऱ्या ट्रेन आता जानेवारी 2023 पर्यंत धावणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी बघून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित केली जाईल.
'या' ट्रेनची मुदत वाढली : ट्रेन क्र.01025 दादर-बलिया त्रि-साप्ताहिक विशेष 14 डिसेंबर 2022 पर्यंत होती. ती आता 30 डिसेंम्बर 2022 पर्यंत धावणार (extend deadline for special trains) आहे. तर ट्रेन क्रमांक 01026 बलिया-दादर 16 डिसेंम्बर 2022 पर्यंतची त्रि-साप्ताहिक विशेष धावणारी आता 01 जानेवारी 2023 पर्यंत धावण्यासाठी वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 01027 दादर-गोरखपूर आठवड्यातून 4 दिवस 15 डिसेंबर 2022 पर्यंत विशेष धावणार होती. आता ती 31 डिसेंबर 2022 पर्यंत धावणार आहे. ट्रेन क्र. 01028 गोरखपूर-दादर आठवड्यातून 4 दिवस विशेष ट्रेन धावणार होती. ती देखील 17 डिसेंबरऐवजी आता 02 जानेवारी 2023 पर्यंत धावणार (Central Railway extend deadline for special trains) आहे.
13 डिसेंबरपासून आरक्षण : वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, रचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आरक्षण विशेष गाड्या क्रमांक 01025 आणि 01027 च्या विस्तारित सहलींसाठी विशेष शुल्कावर बुकिंग 13 डिसेंबर 2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल. ज्या ट्रेनचा विस्तार केला आहे. त्याबाबत नोंद घेऊन प्रवाश्यांनी आपले नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी केले (extend deadline for special trains till January) आहे.