ETV Bharat / state

ICICI Bank fraud case : व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना अटक, आयसीआयसीआय बँक अफरातफर प्रकरण भोवले - व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना अटक

आयसीआयसीआय बँक फसवणूक प्रकरणात (ICICI Bank fraud case) केंद्रीय अन्वेषण विभागाने व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. सीबीआयने (Central Bureau of Investigation arrests) वेणुगोपाल धूत (Videocon chairman Venugopal Dhoot) यांच्या नेतृत्वाखालील व्हिडिओकॉन समूहाच्या कंपन्यांना १,८७५ कोटींची कर्जे मंजूर करण्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

Venugopal Dhoot
वेणुगोपाल धूत
author img

By

Published : Dec 26, 2022, 11:52 AM IST

Updated : Dec 26, 2022, 1:43 PM IST

मुंबई : आयसीआयसीआय बँक लोन घोटाळा प्रकरणी चंदा कोचर (Chanda Kochhar) आणि दीपक कोचर (Deepak Kochhar) सोबतच विणूगोपाल धूत (Videocon chairman Venugopal Dhoot) यांना विशेष सीबीआय कोर्टात (Special CBI Court) हजर केले जाणार आहे. सीबीआयने वेणुगोपाल धूत यांच्या नेतृत्वाखालील व्हिडिओकॉन समूहाच्या कंपन्यांना १,८७५ कोटींची कर्जे मंजूर करण्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. चंदा काेचर यांनी मे २००९ मध्ये आयसीआयसीआय बँकेचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी व्हिडीओकॉन कंपनीला १,८७५ कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररीत्या मंजूर केल्याचा आरोप आहे. हे कर्ज २०१७ मध्ये एनपीएमध्ये गेले. या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांना व्हिडीओकॉनकडून ६४ कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा आरोप आहे. व्हिडीओकॉन समूहातील एक कंपनी ‘नूपॉवर रिन्युएबल्स’च्या माध्यमातून हा पैसा दीपक कोचर यांच्या कंपनीला मिळाला, असे ईडीने म्हटले होते.

शेल कंपन्यांमधून 64 कोटी रुपये वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप : चंदा आणि दीपक कोचर यांच्या पाठोपाठ सीबीआयकडून ही तिसरी अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेशी (ICICI Bank) संबंधित कर्ज घोटाळा प्रकरणी (loan scam case) सीबीआयने व्हिडिओकॉन ग्रुपचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना अटक (Central Bureau of Investigation arrests) केली आहे. चंदा कोचर बँकेच्या अध्यक्षपदी असताना आर्थिक अनियमिततेून दिलेल्या बेकायदेशीर कर्जाचे हे प्रकरण आहे. व्हिडिओकॉनला (Videocon) दिलेल्या हजारो कोटींच्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीच्या शेल कंपन्यांमधून 64 कोटी रुपये वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. मागील आठवड्यात शनिवारी सीबीआयने याप्रकरणी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना अटक केली होती. या दोघांची सीबीआय कोठडी आज संपत असल्याने त्यांना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) हजर केले जाणार आहे. त्याचवेळी धूत यांनाही कोर्टात हजर केले जाणार आहे.

आयसीआयसीआय बँकेचे नेमके काय प्रकरण? : आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन संबंधी दिलेल्या कर्ज घोटाळ्यात ईडीने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केलेले आहे. बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, कंपनीचे वेणुगोपाल धूत यांचे आरोपपत्रात नाव आहे. दीपक कोचर हे व्हिडिओकॉनची उपकंपनी असलेल्या न्यू पॉवर या कंपनीचे संचालक होते. चंदा कोचर यांनी या कंपनीला १८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले, पुढे ते कर्ज बुडीत गेले. याप्रकरणी ईडीने २०१८ पर्यंत चौकशी केली होती. यानंतर ईडीने वेणुगोपाल धूत व चंदा कोचर दाम्पत्याविरोधात पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या कारवाईनंतर व्हिडिओकॉनच्या मालमत्तांवर सीबीआयने देखील गुन्हा दाखल करत छापे टाकण्यात आले होते.

Last Updated : Dec 26, 2022, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.