ETV Bharat / state

आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय असलेल्या राहुल गोम्स विरोधात जम्बो कोविड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल - जम्बो कोविड स्कॅम

Jumbo Covid Scam: जम्बो कोविड सेंटर (२०१९) घोटाळ्या (Jumbo Covid Centre) प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं महापालिकेचे कंत्राटदार आणि अधिकारी यांनी 37 कोटींची फसवणूक केल्यानं ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Financial Offenses Wing) युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय असलेल्या राहुल गोम्स विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संविधान कलम ४०६, ४०९, ४२० आणि १२० ब अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jumbo Covid Scam
कोविड सेंटर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 10:50 PM IST

कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी प्रतिक्रिया देताना किरीट सोमैय्या

मुंबई Jumbo Covid Scam: आदित्य ठाकरे यांचा मित्र राहुल गोम्स, ओक्स कन्सल्टन्सी यांच्या विरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेनं भारतीय दंड संविधान कलम ४०६, ४०९, ४२० आणि १२०ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे, (Rahul Gomes) अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी दिली आहे. मुलुंड आणि दहिसर येथील जंबो कोविड सेंटर बांधण्याचा खर्च 28 कोटी इतका आला आणि मुंबई महापालिकेने १४० कोटींचे पेमेंट केला असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुलुंड आणि दहिसरमध्ये जंबो कोविड सेंटर्स उभारण्याच्या कंत्राटात कथित अनियमिततेच्या संदर्भात एफआयआर नोंदवला. ताडदेव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका कंत्राटदार राहुल गोम्सविरुद्ध गुन्हा दाखल केला.

37 कोटींची फसवणूक: बुधवारी उशिरा रात्री आर्थिक गुन्हे शाखेने ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे महापालिका कंत्राटदार राहुल गोम्स, त्याचे वेंडर्स आणि तत्कालीन अज्ञात अधिकार्‍यांवर 37 कोटींच्या फसवणुकीसाठी गुन्हा नोंदवला आहे. राहुल गोम्स यांनी हा घोटाळा ऑक्टोबर 2020 ते ऑगस्ट 2022 दरम्यान केला असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा ठेंगे यांनी स्वत: फिर्याद दिली आहे.

चुकीची माहिती देऊन भाडे स्वीकारले: 1 ऑक्टोबर 2020 ते 1 ऑगस्ट 2022 दरम्यान आरोपींनी कट रचून हा संपूर्ण घोटाळा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संचालक राहुल गोम्सने दहिसर आणि मुलुंडमध्ये जम्बो कोविड सेंटर्स उभारलं. नंतर ते सेंटर्स महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलं. मात्र, अप्रामाणिकपणे चुकीची माहिती दिली आणि महापालिकेकडे भाडे आकारत पैसे स्वीकारले, असा ठपका गोम्स यांच्यावर आणण्यात आला आहे. यापूर्वी देखील आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या रोमीन छेडा याला देखील आर्थिक गुन्हे शाखेने ऑक्सिझन प्लांट घोटाळ्या प्रकरणी चौकशीला बोलावून चौकशीअंती अटक केली होती.

हेही वाचा:

  1. विनाशकाले विपरित बुद्धी! शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी घरफोड्यांचा मार्ग पत्करला, शेवटी अटक अन् तुरुंगवारी
  2. मुलीचा खून करून पसार झालेल्या बापाला तीन तासात बेड्या, दारूच्या वादातून झालं होतं भांडण
  3. बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून 400 ग्राहकांची 1 कोटींची फसवणूक, संचालकाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.